केवळ 2,499 रुपयात घरी न्या होंडाची शानदार बाईक आणि स्कूटर, मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक

देशातील लोकप्रिय टू-व्हीलर निर्माता कंपनी होंडा (Honda) त्यांच्या लोकप्रिय स्कूटर आणि बाईकवर शानदार ऑफर देत आहे.

केवळ 2,499 रुपयात घरी न्या होंडाची शानदार बाईक आणि स्कूटर, मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक
Honda shine - Honda activa
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 7:42 AM

मुंबई : देशातील लोकप्रिय टू-व्हीलर निर्माता कंपनी होंडा (Honda) त्यांच्या लोकप्रिय स्कूटर आणि बाईकवर शानदार ऑफर देत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार तुम्ही फक्त 2499 रुपयांच्या डाउन पेमेंटद्वारे त्यांची लोकप्रिय बाईक होंडा शाईन (Honda Shine) आणि स्कूटर अ‍ॅक्टिव्हा (Activa) घरी घेऊन जाऊ शकता. या दोन्ही दुचाकी वाहनांवर तुम्ही 100 टक्के फायनान्ससुद्धा मिळवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला केवळ 6.5 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. (Buy Honda shine and Honda activa 6G by paying down payment of Rs 2499 and get cashback of rs 5000)

सोबतच तुम्ही बाईक घेताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास तुम्हाला 5000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही मिळू शकतो. तर तुम्ही या ऑफरचा कसा फायदा घेऊ शकता आणि या दुचाकी वाहनांमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.

Honda Shine काय आहे खास?

होंडाच्या या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल सिलिंडर आणि एअर कूल्ड सिस्टिम देण्यात आली आहे. याशिवाय आपणास 125 सीसी इंजिन मिळेल जे 10.59hp ची पॉवर आणि 11 एनएमची टॉर्क जनरेट करेल. या बाईकच्या इंजिनसह, आपल्याला 5-स्पीड गिअरबॉक्स मिळेल. कंपनीचे म्हणणे आहे की होंडा शाईन बीएस 6 (BS6) मॉडेलच्या मायलेजमध्ये 14 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. उत्कृष्ट फ्यूल इंजेक्शन सिस्टिममुळे, या बाईकचा थ्रॉटल रिस्पॉन्स अचूक झाला आहे. बाईकच्या किंमतीबद्दल सांगायचे तर या बाईकच्या ड्रम व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 68,812 रुपये आहे आणि डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 73,512 रुपये इतकी आहे.

Honda Activa 6G मध्ये काय आहे खास?

बाजारात या स्कूटरचे दोन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत, ज्यात स्टँडर्ड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 66,816 रुपये आणि डीएलएक्स व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 68,316 रुपये इतकी आहे. यात 109 सीसी इंजिन देण्यात आलं आहे जे एफआयएस तंत्रज्ञानाने (फ्यूल इंजेक्शन सिस्टम टेक्नॉलॉजी) सुसज्ज आहे. हे इंजिन 8,000 आरपीएम वर 7.68 बीएचपी आणि 5,250 आरपीएम वर 8.79 एनएम पीक टॉर्कची उर्जा उत्पन्न करते.

Activa 6G ही स्कूटर Activa 5G च्या तुलनेत 10 टक्के अधिक मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीच्या मते Activa 6G चं सरासरी मायलेज 55 ते 60 किलोमीटर इतकं आहे. या स्कूटरमध्ये रिमोट हॅच ओपनिंग, मल्टी-फंक्शन की तसेच इतर वैशिष्ट्ये आहेत. बाह्य इंधन भरण्यासाठीची कॅप (एक्सटर्नल फ्यूल फिलिंग कॅप) या स्कूटरमध्ये देण्यात आली आहे. यासह सीटच्या खाली 18 लिटर बूट स्पेस देण्यात आली आहे.

इतर बातम्या

लाँचिंगपूर्वीच Kawasaki Ninja 300 साठी बुकिंग सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कमी किंमत, नवे दमदार फीचर्स, 2021 TVS Star City Plus चा टीझर लाँच

(Buy Honda shine and Honda activa 6G by paying down payment of Rs 2499 and get cashback of rs 5000)

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.