Electric Car चा धमाका…दिवाळीपूर्वी ‘या’ 3 कारची होणार एंट्री
BYD हा भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ब्रँडपैकी टॉप 5 मधील एक असून नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, ब्रँडकडून दिवाळीपूर्वी भारतात एक, दोन नव्हे तर तब्बल तीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात येणार आहे, त्यापैकी एक कार Hyundai Kona EV शी स्पर्धा करणार असल्याचे बोलले जात आहे.
सणासुदीमध्ये नागरिकांचा खरेदीकडे अधिक कल असतो, त्यात दिवाळी (Diwali) म्हटली म्हणजे, हा मुहूर्त साधत अनेक लोक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात. या दिवाळीत देखील अनेक कार निर्माता कंपन्या भारतीय ऑटोमोबाईल बाजारात नवीन गाड्या दाखल करणार आहेत, त्यापैकी एक बीआयडी (BYD) कंपनी आहे. भारतात सर्वाधिक कार विकणाऱ्या टॉप 5 ब्रँडमध्येही या कंपनीचा समावेश आहे. ताज्या माहितीनुसार, कंपनीकडून दिवाळीपूर्वी भारतात तीन इलेक्ट्रिक कार (Electric Car) आणण्यात येणार आहेत. यातीलच एक कार Hyundai Kona EV शी स्पर्धा करेल. ही एसयूव्ही सेगमेंटची कार असेल. सध्या भारतीय बाजारात सध्याच्या बहुतांश इलेक्ट्रिक कार फक्त SUV बॉडी प्रकारात येत आहेत.
कारखाना सुरू होणार
‘गाडीवाडी’ वेबसाइटच्या अहवालानुसार, कंपनी लवकरच भारतात आपला ब करू शकते, त्या ठिकाणी हॅचबॅकपासून सेडन तसेच एसयुव्हीपर्यंत सर्व प्रकारच्या गाड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. कंपनी आपल्या कारमध्ये ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करेल, ज्याच्या मदतीने कार 500 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळवू शकते. BYD कडे सध्या भारतात एक MPV कार आहे.
ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दिसेल झलक
BYD पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारचे प्रदर्शन करू शकते. या अपकमिंग कारमध्ये अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे. कंपनीच्या सध्याच्या MPV कार BYD E6 बद्दल बोलायचे झाले तर, तिला चांगली बूट स्पेस आणि अधिक लेग रूम देण्यात आली आहे. तसेच कंपनी कारमध्ये न बसताच एसी सुरु करण्याची सुविधा देखील देत आहे. या कारची एक्सशोरूम किंमत 29 लाख रुपयांपर्यंत आहे.
BID E6 कारचे फीचर्स
BID E6 कारमध्ये कंपनी 71.7 kWh ची बॅटरी देते, ज्याच्या मदतीने ही MPV कार एका चार्जवर 415 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळवते. ही कार ऑटोमेटिक ट्रांसमिशन आणि 5 लोकांच्या सीटिंग क्षमतेसह दाखल होणार आहे.