Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य ओकतोय आग नि कारच्या AC ने तोडला दम, चिडचिड करुन उपयोग काय, हा उपाय तर करा

Car AC Tips and Tricks : उन्हाळ्यात कारने प्रवास करायचा म्हणजे AC शिवाय पर्यायच नाही. त्यात AC ने दगा दिला तर प्रवास मोठा त्रासदायक ठरतो. या टिप्स फॉलो केल्या तर तुमचा एसी थंडगार हवा देईल. काय आहेत या टिप्स, जाणून घ्या..

सूर्य ओकतोय आग नि कारच्या AC ने तोडला दम, चिडचिड करुन उपयोग काय, हा उपाय तर करा
या टिप्स पडतील उपयोगी
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 5:10 PM

देशातील अनेक भागात मे ते जून महिन्यात भंयकर उन्हाळा असतो. सूर्य आग ओकतो. याच काळात सुट्यांचा रतीब असल्याने अनेकदा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे कुटुंबासह बाहेर पडावे लागते. अशा भयंकर उन्हात एअर कंडिशनर काम करत नसेल तर मोठी अडचण उभी ठाकते. कारचा एसी काम करत नसेल तर या टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतील.

कारमध्ये करु नका प्री-कुलिंग

कारमध्ये बसण्यापूर्वीच अनेक जण कारचा एसी सुरु ठेवतात. त्यांना वाटतं आतून कार चिल्ड होईल. पण असू करु फार काही पदरात पडत नाही. जेव्हा तुम्ही कार चालवत असाल तेव्हाच एअर कंडिशनर उपयोगी पडते. कार जितक्या वेगाने धावेल, एसी पण तसाच जोरात काम करेल. AC चे कंप्रेसर काम करेल आणि कार थंड होईल.

हे सुद्धा वाचा

कारची खिडकी उघडा

कार सुरु केल्यावर एसी सुरु करा. कारच्या खिडक्या काही सेकंदा करीता उघड्या करा. त्यामुळे कारमधील उष्ण हवा बाहेर पडण्यास मदत होईल. तर एसी सुरु झाल्याने आतील भाग लवकरच थंड होण्यास मदत होईल. आतील उष्ण हवा तशीच राहिल्यास एसीचा प्रभावी परिणाम दिसायला वेळ लागू शकतो.

AC चे तापमान ठेवा कमी

AC चे तापमान कमी ठेवा. त्यामुळे एअर-कंडिशनिंग चांगली होईल. एसीचा पंखा योग्यरित्या कुलिंग करेल. तर इंधनाची पण मोठी बचत होईल. साधारणपणे AC सिस्टिममध्ये 38 डिग्री सेल्सियसवर हवा थंड होण्याची प्रक्रिया सुरु होते. जर तुम्ही या एसीचे तापमान वाढवले तर त्यामुळे सिस्टिमवर दबाव येतो. त्यामुळे थंड हवा पुन्हा गरम होऊन येते. अथवा थंडव्याची क्षमता कमी होते.

AC फिल्टर ठेवा स्वच्छ

कारच्या AC चे फिल्टर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कार केबिनच्या एअर फिल्टर तपासा. जर हे स्वच्छ नसेल तर लगेच बदला. फिल्टर अस्वच्छ झाल्यास स्वच्छ हवा कारच्या आत येत नाही. कार नवीन असेल तर हे फिल्टर तपासणे अधिक सोयीस्कर असते.

एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.