Car Alert | लगेचच हटवा हे स्टीकर, नाहीतर कार नाही दिसणार रोजच्या जागेवर

Car Alert | तुमच्या कारवर लावले असेल हे स्टीकर तर लगेचच काढा. हा स्टीकर लवकर नाही काढले तर चोरांचे आयाते फावणार. त्यांना तुमची कार चोरी करणे अजून सोपे होईल. तुम्हाला वाटत असेल असं कसं एखाद्या स्टीकरमुळे कार चोरी होत असेल, तर जाणून घ्या कोणते आहे हे स्टीकर आणि कशी होते कारची चोरी.

Car Alert | लगेचच हटवा हे स्टीकर, नाहीतर कार नाही दिसणार रोजच्या जागेवर
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 11:44 AM

नवी दिल्ली | 11 जानेवारी 2024 : जर तुमच्याकडे कार असेल अथवा तुमच्या जवळच्या व्यक्तीकडे कार असेल तर ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला हायसे वाटल्याशिवाय राहणार नाही. अनेक कारवर आपण कोणते ना कोणते स्टीकर चिकटवलेले आपण नेहमी पाहतो. पण हे स्टीकर तुम्ही लवकर हटवले नाही तर तुमची कार चोरांच्या हाती लागू शकते. चोर तुमच्या कारवरील स्टीकरचा गैरफायदा घेत दुसरी किल्ली,चावी तयार करतील. चला तर जाणून घ्या, तुमच्या कारसाठी कोणते स्टीकर ठरु शकते घातक आणि कशी तुमची कार होऊ शकते चोरी?

कारवरील हे स्टीकर टाकेल संकटात

  1. तुम्हाला वाटत असेल की, एका स्टीकरमुळे कार कशी चोरीला जाऊ शकते, नाही का? हे स्टीकर कारच्या काचेवर चिकटवलेले असते. त्याला विंडो स्टीकर म्हणतात. या स्टीकरवर कारची सर्व माहिती नोंदवलेली असते. या स्टीकरवर एक QR Code पण नोंदवलेला असतो. हा कोड स्कॅन करुन तुमच्या कारची इत्यंभूत माहिती चोरांच्या हाती लागते. त्याचा ते गैरफायदा घेऊ शकतात.
  2. तसे हे स्टीकर तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. पण एकदा चोरांची त्यावर नजर पडली की मग तुम्ही अडचणी येता. तुमची कार चोरी होण्याची शक्यता वाढते. चोर तुमच्या कारवरील स्टीकरचा QR Code स्कॅन करुन कारची माहिती काढतात. त्याआधारे दुसरी चावी तयार करतात. कारची दुसरी चावी तयार केल्यानंतर आरामशीर तुमची कार पळवतात. त्यासाठी त्यांना कोणतीच आगाऊ खटपट करावी लागत नाही. दिवसाढवळ्या सहज तुमची कार ते घेऊन जाऊन शकतात.
  3. हे सुद्धा वाचा

करा हा उपाय

  1. जेव्हा पण तुम्ही नवीन कार खरेदी करता त्यावेळी एखादे स्टीकर लावले आहे की नाही याची खातरजमा करा. कारच्या कोणताही बाजूला ते लावलेले असू शकते. केवळ विंडोवरच नाही तर कोणत्या बाजूला हे स्टीकर लावण्यात आलेले असते. तसे असेल तर ते अगोदर काढून घ्या.
  2. हे स्टीकर प्रत्येक नवीन कारवर असेलच असे नाही. पण काही मॉडेल्सवर हे स्टीकर चिकटवण्यात येते. कंपनी हे स्टीकर तुमच्या सुविधेसाठी देते. पण आजकालचे चोर पण हायटेक झाले आहेत. ते या स्टीकरचा वापर करुन दुसरी चावी तयार करतात आणि कार चोरतात.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.