Car Driving Skills : कार चालवताना फॉलो करा या 10 टिप्स, लोकही म्हणतील तुम्हाला एक्सपर्ट ड्रायव्हर

Car driving skill कार चालवणे ही देखील एक कला आहे. अनेक जण इतक्या सफाईदारपणे कार चालवतात की त्यांच्यासोबत कायम सुरक्षीत वाटतं. ही लोकं खाली दिलेल्या सिक्रेट टिप्स फॉलो करतात.

Car Driving Skills : कार चालवताना फॉलो करा या 10 टिप्स, लोकही म्हणतील तुम्हाला एक्सपर्ट ड्रायव्हर
कार ड्राइव्हींग स्किलImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 9:43 PM

मुंबई : अनेक जण इतकी सफाईदारपणे कार चालवतात की त्यांच्या ड्राइव्हींग स्किलची (Car driving Skills) स्तुती करावी तितकी कमीच असते. जर तुम्हालाही अशीच  कार चालवायची असेल किंवा तुम्ही नुकतीच कार चालवायला सुरुवात केली असेल, तर तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही सुरक्षित कार चालवू शकाल. आज आपण कार ड्रायव्हिंगशी संबंधित काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि कार चालवताना उपयोगी पडू शकतात.

गाडीची संपूर्ण माहिती असावी

तुम्ही जी गाडी चालवणार आहात त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असायला हवी. सर्वप्रथम, तुम्हाला कारच्या गिअर अ‍ॅडजस्टमेंटबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे. यासोबतच तुम्हाला क्लच आणि ब्रेक्सचीही पूर्ण माहिती असायला हवी. गाडी शिकत असताना वाहनाचा वेग नेहमी कमी असावा आणि त्यानुसार गाडीचा गिअर शिफ्ट करावा.

आसनाची स्थिती परिपूर्ण असावी

कार चालवताना तुम्ही तुमच्या बसण्याच्या स्थितीकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. खरे तर कारमधील तुमची बसण्याची स्थिती योग्य असेल तर तुम्ही गाडी योग्य प्रकारे चालवू शकाल. यासाठी तुम्ही तुमची बसण्याची स्थिती नेहमी अशा प्रकारे ठेवावी की तुमच्या पाठीवर, गुडघे आणि खांद्यांवर जास्त ताण किंवा दबाव येणार नाही. तसेच, कारमध्ये बसताना तुमचे पाय ब्रेक आणि क्लचपर्यंत आरामात पोहोचू शकतील, जेणेकरून ते वापरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, हे लक्षात ठेवा.

हे सुद्धा वाचा

रस्त्यावर काळजीपूर्वक वाहन चालवा

रस्त्यावरून गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवावी. त्यामुळे गाडी चालवण्यापूर्वी रीअर व्ह्यू मिरर आणि साईड मिरर त्यानुसार अॅडजस्ट करा जेणेकरून तुम्हाला रियर व्ह्यू आणि साइड व्ह्यू सहज पाहता येईल. लक्षात ठेवा की जास्त रहदारीच्या ठिकाणी काळजीपूर्वक वाहन चालवा आणि वाहतूक नियमांचे पालन करा.

संयमाने वाहन चालवा

बरेचदा लोकं गाडी चालवायला शिकल्याबरोबर रस्त्यावर वेगाने गाडी चालवायला लागतात. अतिवेगाने वाहन चालवणे किती धोकादायक आहे हे ते विसरतात. त्यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन भरधाव वेगाने वाहन चालवू नका. गाडी चालवण्याचा तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास येईपर्यंत गाडीचा वेग कमी ठेवा.

स्टिअरिंग नेहमी व्यवस्थित धरा

वाहन चालवताना, नेहमी लक्षात ठेवा की तुमचे स्टीयरिंगवर पूर्ण नियंत्रण आहे आणि स्टीयरिंग नेहमी 9×3 स्थितीत धरा. स्टीयरिंग व्हीलवर तुमचे पूर्ण नियंत्रण असेल तर तुम्ही वाहन कुठेही नेऊ शकता.

गियर बदलताना काळजी घ्या

याशिवाय गियर्स बदलताना काळजी घ्या. गियर बदलल्यानंतर तुमचा हात गियरवर सोडू नका, तो पुन्हा स्टिअरिंगवर आणा. कारण तुमचा एक हात गियरवर राहिला तर तुम्ही फक्त एकाच हाताने गाडी चालवत असाल, जे खूप धोकादायक असू शकते.

समोरच्या वाहनापासून योग्य अंतर ठेवा

वाहन चालवताना समोरील वाहनापासून थोडे अंतर ठेवा. कारण अनेक वेळा पुढे जाणारे वाहन अचानक ब्रेक लावते आणि आपण वेळेवर ब्रेक लावू शकलो नाही तर अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत नेहमी योग्य अंतर ठेवून वाहन चालवा.

वेगानुसार लेनमध्ये गाडी चालवा

वाहन चालवताना लेन लक्षात ठेवा. कार नेहमी पहिल्या लेनमध्ये चालवा. लोडिंग वाहन दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेनमध्ये चालवावे.

विनाकारण हॉर्न वाजवू नका

विनाकारण हॉर्न कधीही वाजवू नये. आजूबाजूला आणि वाहनासमोरून चालणाऱ्या लोकांना सावध करण्यासाठी हॉर्नचा वापर नेहमीच केला जातो. मात्र कर्कश्य हाॅर्नमुळे लोकांना त्रास होतो त्यामुळे  विनाकारण हॉर्न वाजवणे टाळावे.

शांत मनाने वाहन चालवणे

वाहन चालवताना मन शांत असावे. कारण तुमच्या मनात अशांतता असेल तर छोटीशी चूकही तुमचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू शकते. त्यामुळे वाहन चालवताना नेहमी शांत राहा.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.