नवी दिल्ली : तुमच्या घरात कार असेल आणि तुमची कार (car) दीर्घकाळ सुरळीतपणे चालावी असे वाटत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तुमची कार खरेदी करता तेव्हा कंपनी तुम्हाला कारसोबत एक कार मॅन्युअल (manual) देते, ज्यामध्ये कारची देखभाल कशी करावी आणि सर्व्हिसिंग (car maintenance) कसे करावे, याची संपूर्ण माहिती दिली जाते. बर्याच वेळा काही वापरकर्ते कार घेतल्यानंतर या मॅन्युअलकडे लक्ष देत नाहीत आणि ते कुठल्यातरी कोपऱ्यात पडून राहते.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही कार मॅन्युअलची प्रत हरवली किंवा गमावली असेल, तर तुम्ही ती कंपनीच्या वेबसाइटवरून पुन्हा मिळवू शकता. यामध्ये स्पेसिफिकेशन, सेफ्टी, चाइल्ड सेफ्टी, की आणि रिमोट कंट्रोल, फ्यूएल आणि रिफ्यूएलिंग तसेच आणि कारची काळजी घेणे, इत्यादी गोष्टींसदर्भातील माहिती सहज उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या कारची देखभाल या मार्गांनी करू शकता.
टायर प्रेशरची घ्या काळजी
कारमध्ये टायर फिट असणे कारच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. वेळोवेळी टायरचे प्रेशर तपासत रहा. हे केवळ मायलेज सुधारत नाही तर लवकर झीज होणे आणि टायर फुटणे देखील प्रतिबंधित करते. यासाठी जेव्हाही तुम्ही कारमध्ये इंधन टाकाल तेव्हा एकदा गाडीचे टायर, त्यातील हवेचे प्रेशर हे देखील तपासून पहा.
ऑईल व ऑईल फिल्टर बदला
ऑईल हे कारमधील तेलामुळे चालणाऱ्या पार्ट्ससाठी वंगण म्हणून कार्य करते. अशा परिस्थितीत, आपण वेळोवेळी कारचा तेलाचा फिल्टर साफ करणे किंवा बदलणे महत्वाचे आहे. मास्टर सिलेंडरचे झाकण उघडण्यापूर्वी, त्यावर साचलेली घाण साफ करा.
बॅटरीचीही घ्या योग्य काळजी
कारची बॅटरी स्वच्छ ठेवा, अशा स्थितीत धुळीमुळे करंट लागू शकतो. बॅटरी पुसण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा आणि बॅटरी पोस्ट्स आणि टर्मिनल्स स्वच्छ ठेवा. इग्निशन बंद ठेवून कार चालू ठेवू नका कारण यामुळे बॅटरीचे आयुष्य खराब होईल.
कारचे इंजिन नीट स्वच्छ करावे
कारचे इंजिन अंतर्गतरित्या स्वच्छ ठेवण्यासाठी फक्त स्वच्छ इंधन वापरा. वेळोवेळी बाहेरूनही स्वच्छ करा. धूळ तसेच गळतीमुळे इंजिनचे नुकसान होऊ शकते त्यामुळे घाण काढून टाकण्यासाठी कोणतेही इंजिन क्लीनर वापरा आणि इंजिन आतून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ करा.