कार खरेदी करणे झाले महाग, महिंद्रापासून टाटापर्यंत ‘या’ कंपन्यांनी वाढवली किंमत

 जर तुम्ही नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण कार खरेदी करणे महाग झाले आहे. अनेक कार कंपन्यांनी त्यांच्ग्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. यात टाटा, महिंद्रा आणि मारुतीचा समावेश आहे. नव्या वर्षात कोणत्या कंपनीच्या गाड्या महागणार आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

कार खरेदी करणे झाले महाग, महिंद्रापासून टाटापर्यंत 'या' कंपन्यांनी वाढवली किंमत
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 3:52 PM

नववर्षांनिमित्त कार खरेदी करणे तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा कोणत्या कार कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किंमती वाढवलेल्या ते एकदा चेक करून घ्या. यामध्ये मारुती, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन, एमजी आणि निसान या कंपन्यांनी किंमती वाढवल्या आहेत. जानेवारीपासून अनेक वाहनांच्या किमती वाढल्या आहेत. यात मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि व्होल्वो सारख्या लक्झरी वाहनांचाही समावेश आहे. कोणत्या कंपन्या कारच्या किंमती वाढवत आहेत ते पाहूयात.

या कार खरेदी करणे महागात

महिंद्रा – महिंद्रा कंपनीने 1 जानेवारी 2025 पासून भारतातील त्यांच्या संपूर्ण पोर्टफोलिओच्या किंमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. जर तुम्ही महिंद्राची कार आज किंवा आजनंतर कधीही खरेदी केली तर ती तुम्हाला गेल्या वर्षीपेक्षा महाग मिळेल.

हे सुद्धा वाचा

मारुती सुझुकी- मारुती सुझुकीची कार आता खरेदी केल्यास तुम्हाला 4 टक्के महाग णार आहे. इतर वाहन कंपन्यांप्रमाणेच कंपनीनेही डिसेंबरमध्ये ही किंमत वाढवणार असल्याचे जाहीर केले होते.

मर्सिडीज बेंझ – मर्सिडीज कंपनीने देखील त्यांच्या मर्सिडीज बेंझ या सर्व कारच्या किंमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ करत आहे. कंपनीने २०२४ मध्येच कारच्या किंमतीत वाढ करणार असल्याचं खुलासा केला होता.

ऑडी – ऑडी इंडियानेही कारच्या किमती तब्बल 3 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कंपनीच्या बाजारात जवळपास १६ मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

बीएमडब्ल्यू – बीएमडब्ल्यूने डिसेंबर 2024 मध्येच सांगितले होते की ते 2025 च्या सुरूवातीस वाहनांच्या किंमतीत वाढ करणार आहे. त्यातच कंपनीने नवीन वर्षात कार खरेदी करणं तीन टक्क्यांपर्यंत महाग करणार आहे.

ह्युंदाई – ह्युंदाई मोटर इंडियाने नवीन वर्षांत त्यांच्या संपूर्ण उत्पादनांच्या किंमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ह्युंदाईचे कोणतेही मॉडेल खरेदी केल्यास ते तुम्हाला वाढीव किंमतीसह खरेदी करावी लागणार आहे.

टाटा- टाटा मोटर्स कंपनी ही हॅचबॅक आणि एसयूव्ही सेगमेंटपर्यंतची सर्व मॉडेल्स बाजारात विकत आहेत. टाटा मोटर्सही नव्या वर्षापासून त्यांच्या वाहनांच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ केली आहे.

या वाहनांच्या किमतीही वाढल्या 

एमजी मोटर इंडियाने त्यांच्या वाहनांच्या किंमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. किआ कंपनीने देखील त्यांच्या मॉडेल्सच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. स्कोडाही नव्या वर्षापासून त्यांच्या कारच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करत आहे. जर तुम्ही जीप एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती आता दोन टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकते.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.