कार विक्रीचा मोडला रेकॉर्ड; 43 लाख कारची विक्री, शहर की गाव, कोणी मारली बाजी?

Car sales break record : देशात कार विक्रीचे तुफान आले. देशात सरत्या वर्षात 43 लाख कारची विक्री झाली. या नवीन आकडेवारीने कंपन्या सुखावल्या आहेत. तर बड्या शहरातील वाहतुकी कोडींची समस्या वाढल्या आहेत. या विक्रीत शहर की गाव, कोणी मारली बाजी?

कार विक्रीचा मोडला रेकॉर्ड; 43 लाख कारची विक्री, शहर की गाव, कोणी मारली बाजी?
तुफान कार विक्री
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 10:28 AM

भारतीय प्रवासी वाहतूक बाजाराला सरते वर्षे फायदेशीर ठरले. वर्ष 2024 मध्ये 43 लाख कारची विक्री करण्यात आली. यामध्ये मारूती सुझुकी, टोयोटा किर्लोस्कर, टाटा मोटर्स, हुंदई आणि किआ सारखे टॉप ब्रँड कंपन्यांनी जोरदार कमाई केली आहे. या कंपन्यांच्या कारची जमके विक्री झाली. शहरातच नाही तर गावात सुद्धा प्रवासी वाहनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कार विक्रीचे तुफान दिसून आले.

SUV च्या विक्रीत सातत्याने वाढ दिसून येत आहे. कार विक्री वाढीत ग्रामीण बाजाराचा मोठा हाथभार लागला आहे. तर वर्ष 2023 मध्ये कार विक्रीचा आकडा 41.1 लाख इतका होता. सरत्या वर्षातील विक्रीशी त्याची तुलना केली असता, वर्ष 2024 मध्ये कार विक्रीतील प्रकरणात जवळपास 4.5 ते 4.7 टक्के वाढ दिसून आली.

ग्रामीण भागात मारुतीचा डंका

हे सुद्धा वाचा

मारुती सुझुकीची ग्रामीण भागात क्रेझ दिसून आली. कंपनीने 17,90,977 यूनिट्सची विक्री करत गेल्या सहा वर्षातील सर्व रेकॉर्ड जमीनदोस्त केले. सहा वर्षातील ही पहिली सर्वात मोठी विक्री ठरली. वर्ष 2018 मध्ये 17,51,919 कार विक्री झाली होती. तर 2023 मध्ये 17,26,661 कारची विक्री झाली होती.

या कंपनीच्या कारला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. डिसेंबर 2024 मध्ये 16 टक्के दरवाढ नोंदवण्यात आली. मारुती सुझुकीने डिसेंबर 2024 मध्ये 1,30,117 कारची विक्री केली. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा 24.18 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. डिसेंबर महिन्यात ग्रामीण विक्रीत 16 टक्क्यांची वाढ दिसून आली.

हुंदई कंपनीला कसे गेले वर्ष 2024?

हुंदई मोटर इंडियाने वर्ष 2024 मध्ये 6,05,433 कारची विक्री केली. यामध्ये 67.6 टक्के विक्री ही एसयुव्ही सेगमेंटची होती. तर डिसेंबर 2024 मधील कार विक्रीत गेल्यावर्षीपेक्षा 1.3 टक्क्यांची किरकोळ घसरण दिसली.

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सने डिसेंबर 2024 मध्ये 44,289 कारची विक्री केली. कंपनीने एक टक्क्यांची वाढ नोंदवली. कंपनीने सलग चौथ्या वर्षात 5.65 लाख कारची विक्री केली. कंपनीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला.

टोयोटा किर्लोस्कर मोटर

टोयोटा किर्लोस्कर मोटरसाठी सरते वर्ष फायदेशीर ठरले. कंपनीने वर्ष 2024 मध्ये 3,26,329 कारची विक्री झाली. 2023 मधील विक्रीचा आकडा पाहता विक्रीत 40 टक्क्यांहून अधिक आहे. एसयुव्ही आणि एमपीव्ही सेगमेंटचा या वाढीत सर्वाधिक वाटा आहे.

संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.