Car Theft Insurance | अलीकडे कार चोरीची प्रकरण बरीच वाढली आहेत. एक कार विकत घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. पण तीच कार चोरी झाली, तर लोकांच मोठ आर्थिक नुकसान होतं. या नुकसानीचा फटका टाळण्यासाठी Insurance प्लान विकत घेतात. कार डॅमेज किंवा चोरी झाल्यास वीमा कंपनी नुकसान भरपाई देते. भारतात कार चालवण्यासाठी विमा पॉलिसी आवश्यक आहे. विमा पॉलिसी दोन प्रकारची असते. कार चोरीनंतर नुकसान भरपाईसाठी तुम्हाला कुठला प्लान विकत घ्यावा लागेल त्या बद्दल जाणून घ्या.
Car insurance अशी एक पॉलिसी आहे, ज्यामुळे कार मालकाला कारच नुकसान किंवा चोरी झाल्यास भरपाईची सुविधा मिळते. भारतात दोन प्रकारची कार insurance पॉलिसी मिळते, थर्ड पार्टी insurance आणि कॉम्र्पिहेंसिव insurance पॉलिसी
Third-Party Insurance : ही पॉलिसी कुठली दुसरी व्यक्ती किंवा प्रॉपर्टीच नुकसान झाल्यास कार मालकाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करते.
Comprehensive Insurance : ही पॉलिसी कार मालकाला कारच कुठल्याही प्रकारच नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करते. यात कार चोरी सुद्धा आहे.
त्यामुळे कार चोरी झाल्यास तुम्हाला फायनान्शिअल सिक्युरिटी हवी असं वाटत असेल, तर Comprehensive Insurance पॉलिसी घ्या.
Comprehensive Insurance पॉलिसीचे फायदे
कार चोरी झाल्यास भरपाई : कार चोरी झाल्यास, Comprehensive Insurance पॉलिसी अंतर्गत विमा कंपनी तुम्हाला कारच्या मार्केट व्हॅल्यूच्या हिशोबाने इंश्योर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) इतकी भरपाई देईल.
Comprehensive Insurance पॉलिसीमध्ये आग, अपघात, नैसर्गिक संकटासारख्या डॅमेजपासूनही कव्हर मिळतं.
comprehensive Insurance पॉलिसीचा पीरियड एक वर्षांचा आहे.
हीच पॉलिसी फायद्याची
comprehensive Insurance पॉलिसी कार मालकांसाठी एक आवश्यक प्रोटेक्शन कव्हर आहे. ही पॉलिसी कार चोरी झाल्यास मालकाला प्रोटेक्शन देते. त्यामुळे तुम्ही कार सुरक्षेबद्दल चिंतीत असाल, तर comprehensive Insurance पॉलिसी जरुर घ्या.