रस्त्यावरील कॅमेऱ्याने तुमचे Traffic Challan कापले का? हे कसे शोधावे जाणून घ्या

वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळले जात आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी रस्त्यांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती नियमांचे उल्लंघन करताच रस्त्यावरील या कॅमेऱ्यांमुळे तुमचे ट्रॅफिक चालान कापले जाते. अनेकवेळा चालान कापले जाते आणि तुम्हाला माहितही नसते, आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरबसल्या ऑनलाइन चालान कसे तपासू शकता?

रस्त्यावरील कॅमेऱ्याने तुमचे Traffic Challan कापले का? हे कसे शोधावे जाणून घ्या
camera Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 9:32 PM

वाहन चालवणाऱ्यांसाठी तसेच तुम्ही जेव्हा गाडीने प्रवास करताना किंवा गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. हे नियम नागरिकांच्या फायद्यासाठीच बनवलेले असतात. अशा परिस्थितीत वाहन चालवताना झालेली छोटीशी चूक ट्रॅफिक चालान कापू शकते. म्हणजेच मुलाला शाळेत सोडायचं की ऑफिसला जायचं, तसेच ऑफिसला जाण्यासाठी अनेकजण रोज कार, बाईक, स्कूटी वापरतात आणि कधी उशीर झाल्यावर घाईगडबडीत लाल सिग्नल असताना देखील नियमाचे उल्लंघन करून पुढे जातात. तर कधी बाईक-स्कूटी चालवण्याआधी हेल्मेट घालायला विसरतात. अश्याने तुमच्या गाडीचे चालान कापले जाते.

आता सर्वत्र ट्रॅफिक पोलिस असू शकत नाहीत, अशा परिस्थितीत रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना पकडण्यासाठी सरकारने रस्त्यावर सिग्नलवर कॅमेरे बसवले आहेत. तुम्ही जर कोणते नियम मोडले तर या कॅमेऱ्यांच्या नजरेतून सुटणे अशक्य असते, अनेकदा रस्त्यावरील कॅमेऱ्याने चालान कापले आहे हे तुम्हाला कळत नाही. आता अशा तऱ्हेने जर तुम्हालाही तुमच्या घाईगडबडीत कोणतेही चालान कापले गेले आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ई-चालान कसे तपासू शकता?

ऑनलाईन पद्धतीने करा चालान चेक

ट्रॅफिक चालान कापण्यात आले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in/index/accused-challan अधिकृत साइटवर जावे लागेल. या साईटवर जाऊन चालान नंबर, वाहन नंबर आणि डीएल नंबर टाकून अशा तीन प्रकारे तुम्ही चालान डिटेल्स काढू शकता.

जर तुम्हाला चालान नंबर माहित नसेल तर तुम्ही वाहननंबर टाकून ही चालान शोधू शकता. वाहन क्रमांक आणि कॅप्चा टाकून गेट डिटेलवर टॅप करताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. लक्षात घ्या की ओटीपी टाकल्याशिवाय तुम्ही लॉग इन करू शकणार नाही.

ओटीपी टाकताच तुमच्यासमोर संपूर्ण माहिती उघडेल आणि तुम्हाला तुमचा कार नंबर, तुमचे नाव, चालान नंबर, कोणत्या राज्यात चालान कापले आहे, चालान ची तारीख, चालान ची रक्कम, स्टेटस, पेमेंट सोर्स, चालान प्रिंट, पावती, पेमेंट लिंक अशा महत्त्वाच्या गोष्टी दिसतील.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे चालान चुकीच्या पद्धतीने कापले गेले आहे, तर तुम्ही त्यासाठी न्यायालयात दाद मागू शकता. जर तुम्हाला पेमेंट सोर्समध्ये NA दिसला आणि पेमेंट लिंकमध्ये स्टेटस लिहिलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं चालान कोर्टात गेलं आहे आणि आता तुम्हाला व्हर्च्युअल कोर्टामार्फत तुमचं चालान भरावं लागेल.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.