Electric Scooters | 1 लाखांच्या आत येतील या इलेक्ट्रिक स्कूटर; कोणत्या कंपन्या आहेत यादीत
Electric Scooters | जर तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची इच्छा असेल तर तुम्हाला एकापेक्षा एक जोरदार मॉडेल्स मिळतील. या यादीत Ola, Kinetic Green शिवाय Acer आणि Okinawa कंपनीच्या मॉडल्सचा समावेश आहे. या सर्व मॉडल्सच्या किंमती आणि ड्रायव्हिंग रेंजविषयी घ्या जाणून...
नवी दिल्ली | 14 February 2024 : पेट्रोलनंतर आता दुचाकी सेगमेंटमध्ये Electric Vehicles चा मोठा दबदबा आहे. जर तुम्हाला पण 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये पेट्रोल ऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर अनेक पर्याय समोर आहेत. या यादीत Ola, Okinawa, Kinetic Green आणि Acer कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर्स मिळतील. या यादीत आताच बाजारात दाखल झालेली Luna चा इलेक्ट्रिक अवतार पण आहे. अगदी काही रुपये खर्चात या इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला चांगली रेंज देतील. या ईव्हीची किंमत पण एक लाखांच्या आत आहे.
- Ola S1X Price in India – 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत ओला इलेक्ट्रिक स्कूटर मिळेल. ही स्कूटर तुम्हाला 2 kWh/3 kWh अशा दोन बॅटरी पर्यायामध्ये मिळतील. 2 kWh बॅटरीचे मॉडेल फुल चार्जमध्ये 95 किलोमीटर आणि 3kWh चे मॉडेल 143 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. या स्कूटरची किंमत 79,999 रुपयांपासून सुरु होईल.
- Okinawa Praise Pro Price in India – ओकिनावा कंपनीच्या स्कूटरचा पण पर्याय समोर आहे. हे इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फुल चार्ज झाले की 81 किलोमीटर पर्यंत धावते. 56kmph ची सर्वात जास्त गती असणाऱ्या या स्कूटरची किंमत 99,645 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
- Electric Luna Price in India – Kinetic Green लूनाची सध्या चर्चा सुरु आहे. या लुनाचा इलेक्ट्रिक अवतार भारतीय बाजारात दाखल झाला आहे. या इलेक्ट्रिक मोपेडची किंमत 69,990 रुपये आहे. एकदा फुल चार्ज झाल्यावर या मोपेडची बॅटरी 110 किलोमीटरपर्यंत चालते. म्हणजे इतक्या किलोमीटरपर्यंत लूना चालविता येते. त्यासाठी साधारणतः 15 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- Kinetic Zing Price in India – लूनाला पुन्हा बाजारात नवीन आवतारात आणत असलेली कंपनी Kinetic Green कडे कमी किंमतीतील E Bike आहे. ही बाईक 71,990 रुपयांमध्ये मिळते. ही ई-बाईक एकदा फुल चार्ज केल्यावर 70 किलोमीटरचा पल्ला गाठते.
- Acer MUVI 125 4G Price in India – एस्सर कंपनी पण इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये उतरली आहे. ही स्कूटर 75 kmph च्या टॉप स्पीड देते. या स्कूटरची किंमत 99,999 रुपये आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 80 किलोमीटरचा टप्पा गाठते.
हे सुद्धा वाचा