ELECTRIC CAR: बजेट इलेक्ट्रिक कार हवीय? किंमत ते चार्जिंग स्पीड; टॉप-5 ईव्ही एका क्लिकवर
भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. सर्व इलेक्ट्रिक कारच्या किंमती आणि फीचर्स तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध केल्या आहेत.
नवी दिल्ली- जगभरात इलेक्ट्रिक कार (Electric car) खरेदीचा डंका आहे. जागतिक कार निर्मिती कंपन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी स्पर्धा लागली आहे. ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिज सारख्या वाहन निर्मिती कंपन्या इलेक्ट्रिक कार उत्पादन क्षेत्रात डेरेदाखल झाल्या आहेत. पर्यावरण पूरकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) कडून आर्थिक प्रोत्साहन योजना जारी करण्यात आल्या आहेत. वाढत्या पेट्रोल दरापासून सुटका, प्रदूषणात घट होण्यामुळे पर्यावणाचं संवर्धन यासारखे लाभ सांगितले जातात. भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. सर्व इलेक्ट्रिक कारच्या किंमती आणि फीचर्स तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध केल्या आहेत. तुमच्या बजेटनुसार (Budget electric car) तुम्ही इलेक्ट्रिक कारची निवड करू शकाल.
टाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV)
कारची किंमत 12.49 लाख ते 13.64 लाख रुपयांदरम्यान आहे. कारची रेंज 306 किलोमीटर आहे. केवळ 60 मिनिटांत 80 टक्के चार्जिंग होण्याची क्षमता आहे.
टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV)
कारची किंमत 14.79 लाख ते 17.40 लाख रुपयांदरम्यान आहे. या कारची रेंज 312 किलोमीटर आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, सुपरफास्ट चार्जरच्या सहाय्याने नेक्सॉन ईव्ही 60 मिनिटांत 0-80 टक्के चार्जिंग होऊ शकते.
टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स (Tata Nexon EV Max)
कारची किंमत 17.74 लाख ते 19.24 लाख रुपयांदरम्यान आहे. टाटा नेक्सॉन ईव्हीची रेंज 437 किलोमीटर आहे.
MG ZS EV
किंमतीचा विचार केल्यास MG ZS EV किंमत 21.99 लाख ते 25.88 लाख रुपयांदरम्यान आहे.कारची रेंज 461 किलोमीटर आहे. केवळ 8.5 सेकंदात 0-100 किलोमीटर गती पकडण्याची क्षमता आहे.
ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक (Hyundai Kona Electric)
ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कारची किंमत 23.84 लाख ते 24.02 लाख रुपयांदरम्यान आहे. कारची रेंज 452 किलोमीटर आहे.
किया ईव्ही (Kia EV6)
Kia EV6 ची किंमत 59.50 लाख-64.59 लाख रुपयांदरम्यान आहे. कारची रेंज 528 किलोमीटर आहे.