मुंबई : Citroen भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक व्हेकल आणण्याच्या कामात आहे. स्टेलंटिसचे सीईओ कार्लोस तवारेस यांनी भारतासाठी कंपनीची नवीन पॉलिसी शेअर करताना घोषणा केली आहे, की कंपनी 2023 मध्ये भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन (electric vehicle) बाजारात दाखल करणार आहे. सध्या भारतात टाटा, मारुतीसह अनेक कार उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपला पाय रोवत आहे. त्यात टाटाचा विचार केल्यास इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटाने आपली लोकप्रियता (Popularity) व दबदबा कायम राखला आहे. वाढते पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) किंमती लक्षात घेता याला पर्याय म्हणून विविध कार निर्मात्या कंपन्या आपल्या विविध व्हेरिएंटच्या कार आता इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये बाजारात दाखल करीत आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असताना ग्राहकांचा कलदेखील आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे Citroen देखील आपली पहिलीवहिली इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करण्यासाठी उत्सूक आहे.
दरम्यान, एका माहितीनुसार कंपनीची पहिली कार Citroen C3 क्रॉसओव्हर हॅचबॅकचे EV व्हर्जन असणार असून ते एकसारखे 4 मीटर मॉडेल राहणार आहेत. C3 पुढील महिन्यात भारतात लाँच करण्यात येणार आहे. दरम्यान, हे मॉडेल ट्रॅडिशनल फ्यूअल व्हेरिएंट असणार असल्याचे आधीच सांगण्यात आलेले आहे. EV व्हेरिएंट पुढील वर्षी लाँच करण्यात येणार आहे. C3चे मॉड्यूलर प्लॅटफार्मच्या पुढील दोन वर्षांमध्ये एक कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर किंवा एसयुव्ही मॉडेल आणि एक 7 सीटर MPV बनविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्टेलंटिस यांनी जीपला 2030 पर्यंत जगातील लिडिंग ईव्ही एसयुव्ही ब्रॅंड बनविण्याची योजनादेखील तयार केली आहे. कंपनी पाहिल्यापासूनच जागतिक बाजारात आपल्या मॉडेल्सचे अनेक प्लग-इन हाइब्रिड (पीएचईव्ही) व्हेरिएंट सादर करत आलेली आहे. बँज 4Xe आणि 2023 मध्ये पूर्णत: इलेक्ट्रिक मॉडेल असणार असून परंतु लगेच भारतात या दोघांपेकी कुठल्यातरी एका मॉडेलला आणण्याची योजना नसल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
ब्रॅंडने नुकतेच भारतात जीप मेरिडियन 3-रो एसयुव्ही आणली आहे. तसेच याची किमतीची घोषणा 19 मे 2022 रोजी करण्यात येणार आहे. जीप या वर्षाच्या शेवटापर्यंत लोकली असेंबल करण्यात आलेली ग्रँड चेरोकीलाही सादर करण्यात येणार आहे. मेरिडियननंतर Citroen C3 हॅच भारतात Stellantis चे पुढील प्रोडक्ट राहणार आहे.