CNG कारला उन्हाळ्यात असतो जास्त धोका! अशा प्रकारे घ्या काळजी
जर तुमच्याकडे CNG कार (CNG Car) असेल तर उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी. याबद्दल जाणून घेऊया.
मुंबई : इतर कोणत्याही ऋतुपेक्षा उन्हाळ्यात कारला आग लागण्याचे प्रमाण जास्त असते. तुमच्याकडे सीएनजी कार असेल तर धोका आणखी वाढतो. जर तुमच्याकडे CNG कार (CNG Car) असेल तर उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी. याबद्दल जाणून घेऊया. CNG ची किंमत वाढत असेल पण तरीही पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. म्हणूनच लोकं अजूनही जुन्या गाड्यांमध्ये सीएनजी किट बसवतात. जेव्हा जेव्हा सीएनजी किट बाहेरून बसवायची असेल तेव्हा ती नेहमी प्रशिक्षित मेकॅनिकडूनच बसवली पाहिजे.
कोणत्याही कारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची सर्वाधिक शक्यता असते. बरेचदा लोक काही पैसे वाचवण्यासाठी अप्रशिक्षित मेकॅनिककडून त्यांच्या गाड्या दुरुस्त करून घेतात. अशा परिस्थितीत कार दुरुस्त होण्याऐवजी खराब होण्याचा धोका अधिक असतो. कोणतीही वायर उघडी राहिल्यास शॉर्टसर्किटचा धोका वाढतो आणि त्यामुळे गाडीला आग लागण्याचा धोका वाढतो.
उन्हाळ्याच्या हंगामात, कार तिव्र उन्हापासून संरक्षित केली पाहिजे. अनेकवेळा गाडी दुरुस्त करून घेतल्यानंतर जास्त उष्णतेमुळे वायर एकमेकांना चिकटून राहतात. त्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. म्हणूनच तुम्ही सावलीत कार पार्क प्रयत्न केला पाहिजे. झाड, शेड किंवा झाकलेल्या पार्किंगमध्ये कार पार्क केल्याने कार सुरक्षित राहू शकते.
ऑटोमॅटिक फ्युएल मोड वापरा
तुम्ही तुमच्या कारमध्ये ऑटोमॅटिक फ्युएल मोड चालू करता, तेव्हा कार पेट्रोल मोडमध्ये काम करू लागते. तापमान एका विशिष्ट पातळीवर पोहोचल्यावर कार सीएनजी मोडवर धावू लागते. हा मोड कारच्या इंजिनसाठी खूप फायदेशीर आहे, कारण इंधन प्रभावीपणे ल्युब्रिकेट करण्याची परवानगी देतो.