15 वर्षांपासून भारतीय मार्केटवर राज्य करत असलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल

भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत.

15 वर्षांपासून भारतीय मार्केटवर राज्य करत असलेली 'ही' कार क्रॅश टेस्टमध्ये फेल
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 6:23 PM

नवी दिल्ली : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. (Crash Test : best selling car Maruti Suzuki Swift is completely failed in safety)

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझीकसाठी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) ही कार आतापर्यंतची सर्वात मोठी पॉवर प्लेयर ठरली आहे. कंपनीने आतापर्यंत या कारच्या 23 लाख मॉडेल्सची विक्री केली आहे. ही कार गेल्या काही वर्षांपासून भारतातील बेस सेलिंग कार ठरत आहे. तसेच 2020 मध्येदेखील या कारने भारतीय मार्केटमध्ये दमदार प्रदर्शन केलं आहे. परंतु भारतीयांच्या पसंतीस उतरलेली ही कार सेफ्टीच्या (सुरक्षिततेच्या) बाबतीत खूपच मागे पडली आहे.

स्विफ्ट 2020 मध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. 2020 मध्ये या कारच्या 1,60,700 युनिट्सची विक्री झाली आहे. भारतीय बाजारात स्विफ्टची स्थिती दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमजोर ठरली आहे. तरीदेखील या कारची मागणी मोठी आहे. या कारला सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमी रेटिंग मिळालं आहे.

ग्लोबल एनकॅप रेटिंगमध्ये केवळ 2 स्टार

ग्लोबल एनकॅप (Global NCAP) रेटिंगमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट या कारला केवळ 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार जास्त वजन उचलण्यात सक्षम नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या कारची सुरुवातीची किंमत (एक्स शोरुम) 5.19 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये बीएस-6 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 83 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन 5-स्पीड मॅनुअल आणि 5-स्पीड AMT गियरबॉक्सच्या पर्यायासह सादर करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

Crash Test : टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू ते ईकोस्पोर्ट, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

Crash Test : क्रॅश टेस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या ‘मेड इन इंडिया कार’ पास की नापास?

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

Kia Motors च्या ‘या’ कारमध्ये आढळला दोष; कंपनीने सर्व गाड्या परत मागवल्या

Crash Test : विटारा ब्रेझा, होंडा WR-V ते टोयोटा अर्बन क्रूजर, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

(Crash Test : best selling car Maruti Suzuki Swift is completely failed in safety)

भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.