इलेक्ट्रिक बाईक-स्कूटर वापरा, वर्षाला 22 हजार रुपये वाचवा; सरकारचा मास्टर प्लॅन
केजरीवाल सरकारने स्विच दिल्ली अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स आणि इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत. तसेच यापूर्वीदेखील देशात काही इलेक्ट्रिक वाहनं लाँच झाली आहेत. दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं, प्रामुख्याने ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापराव्यात, यासाठी दिल्ली सरकारने पुढाकार घेतला आहे. (Switch Delhi campaign By switching to electric two wheeler an individual can have monthly savings rs 22000 yearly)
दिल्लीचे परिवहन मंत्री कैशाल गहलोत यांनी गेल्या रविवारी (7 फेब्रुवारी) ‘स्विच दिल्ली अभियाना’च्या पहिल्या सप्ताहाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही ट्विट्स केले. त्यात त्यांनी म्हटलं की, तुमची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केलीत तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरवर्षी 22,000 रुपयांची बचत करु शकता. तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी 20,000 हजार रुपयांची बचत करु शकता. इलेक्ट्रिक वाहन प्रत्येक बाबतीत तुमची बचत करेल.
गहलोत यांनी अजून एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की, “टू-व्हीलर सेगमेंटसह आम्ही ‘स्विच दिल्ली अभियाना’ची सुरुवात करत आहोत. ग्राहकांना होणाऱ्या आर्थिक फायद्यांव्यतिरिक्त महत्त्वपूर्ण पर्यावरणीय लाभांचादेखील यामध्ये समावेश आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या एका दुचाकी वाहनाच्या तुलनेत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सरासरी 1.98 टन कमी कार्बन उत्सर्जन करेल. 11 झाडं लावल्यानंतरच हे शक्य होतं.” यायाच अर्थ तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असाल तर 11 झाडं लावल्यानंतर पर्यावरणाचा जितका फायदा होतो, तितकी पर्यावरणाची मदत तुम्ही करु शकाल
दरम्यान, केजरीवाल सरकारने स्विच दिल्ली अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिल्लीतील दुचाकी वाहनधारकांनी त्यांचा मोर्चा इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांकडे वळवला आहे. दिल्ली ईव्ही धोरणाची (Delhi EV policy) ऑगस्ट 2020 मध्ये सुरुवात करण्यात आल्यानंतर दिल्लीत आतापर्यंत 630 नवीन ईव्ही दुचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. दिल्लीत तुम्ही जर तुमचं वाहन इलेक्ट्रिक वाहनावर स्विच केलंत तर तुम्हाला सर्वाधिक पर्यावरणाचे लाभ मिळतील.
दिल्लीत 500 चार्जर पॉईंट उभारणार
दिल्ली सरकारने देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक व्हीकल (ईव्ही) चार्जिंगसाठीचं टेंडर जारी केलं आहे (निविदा काढल्या आहेत). ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, दिल्ली सरकारकडून देशातील सर्वात मोठ्या ईव्ही चार्जिंगसाठीचं टेंडर कारण्यात आलं आहे. याद्वारे दिल्लीत 100 ठिकाणी तब्बल 500 चार्जर पॉईंट उभारले जाणार आहेत. त्यासाठी नाममात्र शुल्क भरावं लागणार आहे. चार्जिंगसाठी 4 किंवा 5 रुपये प्रति युनिट शुल्क आकारलं जाईल.
जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न : केजरीवाल
दरम्यान, दिल्ली सरकारने थेट लोकांशी संपर्क साधण्यासाठी ‘स्विच दिल्ली अभियान’ सुरु केलं आहे. याच नावाने दिल्ली सरकारने सोशल मीडिया हँडलही सुरु केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन जागरुकता अभियान एका जनआंदोलनात बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे संवाद व विकास आयोग (डीडीसी) ट्विटर, फेसबुक, लिंक्डइन आणि इंस्टाग्रामवर या मोहिमेसाठी सोशल मीडियाचे नेतृत्व करणार आहे.
कमल हसनकडून अभियानाचे कौतुक
निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडिया हँडलचा उपयोग इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, त्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी तसेच ईव्हीच्या फायद्यांविषयी लोकांना जाणीव करुन देण्यासाठी केला जाईल. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी ट्विटरवर ‘स्विच दिल्ली’ अभियानाचे कौतुक केले आहे. हसन म्हणाले की, प्रदूषण नियंत्रित करण्याच्या दृष्टीने हे एक उत्तम पाऊल आहे.
In an effort to make this a people’s movement he has announced grants to those who buy E-Vehicles. He has ensured that the schemes don’t just remain on paper and has taken efforts to ensure that they are implemented effectively.
My best wishes to @ArvindKejriwal (2/2)
— Kamal Haasan (@ikamalhaasan) February 6, 2021
कमल हसन यांना उत्तर देताना केजरीवाल यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, “आम्ही दिल्लीला जागतिक दर्जाचे आणि प्रदूषणमुक्त ईव्ही शहर म्हणून विकसित करण्यास वचनबद्ध आहोत”. आमचे सरकार जनतेला या ईव्ही मोहिमेचे जनआंदोलनात रूपांतर करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवित आहे.
Thank you @ikamalhaasan ji, we are committed to develop Delhi as a world-class & pollution-free EV city. Our government is providing all possible facilities to the people to turn this EV campaign into a mass movement. https://t.co/gw8ByNeu5t
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 6, 2021
दर 4 वाहनांपैकी 1 वाहन इलेक्ट्रिक असणार
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिल्ली सरकारकडून ईव्ही धोरण सुरू करण्यात आले होते, त्यात असे म्हटले आहे की, 2024 पर्यंत दिल्लीत विकल्या जाणाऱ्या प्रत्येक 4 वाहनांपैकी 1 वाहन इलेक्ट्रिक असेल.
Delhi government launches #SwitchDelhi, a mass-awareness campaign to promote the adoption of electric vehicles. The aim is to move towards sustainable transport in the national capital, making Delhi the EV capital of India. pic.twitter.com/1ZGjGFbvwI
— Switch Delhi (@SwitchDelhi) February 4, 2021
हेही वाचा
उद्यापासून फास्ट टॅग अनिवार्य, टॅग नसेल तर दुप्पट टोल लागणार
नवं डिझाईन, अधिक स्पेस, Mahindra ची स्वस्त Scorpio लवकरच बाजारात
Maruti Suzuki च्या उत्पादनात घट, प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये मोठं नुकसान
(Switch Delhi campaign By switching to electric two wheeler an individual can have monthly savings rs 22000 yearly)