मारुती सुझुकीच्या छोट्या गाड्यांची मागणी घटली! महिनाभरात नेमकं काय झालं वाचा

Maruti Suzuki India : देशात सर्वात मोठी ऑटो कंपनी म्हणून मारुती सुझुकीचा नावलौकीक आहे. सर्वसामान्य ग्राहकांची पसंती मारुतीच्या गाड्यांना असते. पण एप्रिल महिन्यात अल्टो, एस प्रेसोसारख्या गाड्यांची मागणी घटली आहे.

मारुती सुझुकीच्या छोट्या गाड्यांची मागणी घटली! महिनाभरात नेमकं काय झालं वाचा
मारुती सुझुकीच्या छोट्या गाड्यांच्या विक्रीत घट, समोर आली आश्चर्यकारक माहिती
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 10:17 PM

मुंबई : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी आहे. जगभरातील टॉप 30 कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचा क्रमांक लागतो. तर देशामध्ये सर्वाधिक गाड्या या कंपनीच्या विकल्या जातात. पण एप्रिल 2023 मध्ये आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. कंपनीचा ओव्हरऑल होलसेल एप्रिल 2023 मध्ये 7 टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिल 2023 मध्ये मारुती सुझुकीने एकूण 1,60,529 युनिट्स डीलर्सला डिस्पॅच केले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल 2022 मध्ये 1,50,661 युनिट्स डिस्पॅच केले होते. त्यामुळे विक्रीत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कंपनीचा डॉमेस्टिक सेलही वाढला आहे. पण छोट्या कारच्या मागणीत घट झाली आहे.

छोट्या कारच्या विक्रीत घट

मारुतीच्या विक्रीच्या आकडेवारीवरून एक माहिती समोर आली आहे. यात अल्टो आणि एस प्रेसोसारख्या छोट्या गाड्यांची मागमी 18 टक्क्यांनी घटली आहे. कंपनीने एप्रिल 2023 मध्ये 14,110 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 17,137 युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच विक्रीत 18 टक्क्यांची घट दिसत आहे.

या व्यतिरिक्त कॉम्पॅक्ट गाड्या असलेल्या स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर या गाड्यांचा सेल 27 टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिल 2022 मध्ये 59,184 युनिट्सची विक्री झाली होती. या वर्षी म्हणजेच एप्रिल 2023 मझ्ये 74,935 युनिट्सची विक्री झाली आहे. दुसरीकडे सेडान सियाजची विक्री दुपटीने वाढली आहे. गेल्या वर्षी 576 युनिट्स विकले होते. यंदा एप्रिल 2023 मझ्ये 1017 युनिट्सची विक्री झाली आहे.

देशात 1.43 लाख कारची विक्री

एप्रिल 2023 मध्ये मारुती सुझुकीने डोमेस्टिक बाजारात 1,43,558 युनिट्सची विक्री केली. एप्रिल 2022 मध्ये 1,32,248 गाड्यांची विक्री केली होती. म्हणजेच विक्रीत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र मारुतिच्या निर्यातीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. मागच्या वर्षी 18413 युनिट्सची विक्री झाली होती. आता विक्रीत 8 टक्क्यांनी घट झाली असून 16971 युनिट्सची विक्री झाली आहे.

मोठ्या गाड्यांची मागणी वाढली

युटिलिटी गाड्यांची गणना मोठ्या गाड्यांमध्ये केली जाते. कंपनीच्या ब्रेझा, ग्रँड विटारा आणि आर्टिकासारख्या गाड्यांची विक्री एप्रिल 2023 मध्ये 8 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा विक्री 36,754 युनिट्स आहे. गेल्या वर्षी ही विक्री 33,941 होती. एप्रिल महिन्यात कंपनीने फ्रॉन्क्स लाँच केली आहे. मायक्रो एसयुव्ही सेगमेंटमध्ये ही गाडी चांगली स्पर्धा करेल असा अंदाज आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.