देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक बाजारात, अवघ्या 1999 रुपयांत बुक करा

इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपीने डिटलने (Detel) आज आपली इलेक्ट्रिक टू-व्हीलर डिटल इझी प्लस (Detel Easy Plus) लाँच केली आहे.

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक बाजारात, अवघ्या 1999 रुपयांत बुक करा
Detel Easy Plus
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 5:03 PM

मुंबई : भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपीने डिटलने (Detel) आज राइड एशिया एक्सपोमध्ये आपली इलेक्ट्रिक टू-व्हीलर डिटल इझी प्लस (Detel Easy Plus) लाँच केली आहे. कंपनीने हे इलेक्ट्रिक बाईक 39,999 रुपये किंमतीत बाजारात दाखल केली आहे. (Detel Easy Plus an electric two-wheeler launches in India in price of Rs 39999)

ही B2C ई-बाईक केवळ 1999 रुपये देऊन www.detel-india.com या वेबसाईटद्वारे आजपासून प्री-बुक केली जाऊ शकते. या डिटल बाईकला 170 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळेल. विशेष म्हणजे ही बाईक भारतीय रस्त्यांनुसार डिझाइन करण्यात आली आहे. या लो-स्पीड वाहनात 20AH लिथियम-आयन बॅटरी दिली जाते आणि ही बाईक अवघ्या 4 ते 5 तासांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते.

सिंगल चार्जवर 60 किमी धावणार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही बाईक सिंगल चार्जमध्ये 60 किमी पर्यंतची रेंज देते. ही इलेक्ट्रिक बाईक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे जी स्थिरतेची उत्कृष्ट कार्यक्षमता प्रदान करते. Easy Plus मेटल एलॉय, पावडर-कोटेड आणि ट्यूबलेस टायर्ससह डिझाइन केली आहे. जे सर्व प्रकारच्या रस्त्यांशी सुसंगत असतील, मग ते शहरातील रहदारीचे रस्ते असो किंवा गावातील.

25KMPH स्पीड

डिटल इझी प्लस मेटॅलिक रेड, पर्ल व्हाइट, गनमेटल, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक यलो कलरमध्ये उपलब्ध आहे आणि 170 किलोग्रॅमपर्यंत वजन वाहून नेण्याची या बाईकची क्षमता आहे. याव्यतिरिक्त, इझी प्लस 250 वॅटच्या इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देते. ज्याद्वारे ही बाईक 25 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावते.

कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय

या इलेक्ट्रिक बाईकच्या लॉन्चिंगबद्दल कंपनीचे संस्थापक डॉ. योगेश भाटिया म्हणाले की, “डीटल हा लोकांसाठी एक स्वदेशी ब्रँड आहे, भारताची सर्वात विश्वसनीय लो-स्पीड दुचाकी निर्माता बनण्याचे आमचे ध्येय आहे. लोकांची दैननिक गरज भागवू शकेल, अशी बाईक आम्ही डिझाईन केली आहे. भारतातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय आम्ही डोळ्यांपुढे ठेवले आहे.

रोड साइड असिस्टन्स सुविधा

भाटिया म्हणाले की, डिटल प्रत्येक दुचाकीसह प्रीपेड रोड साइड असिस्टन्स सुविधादेखील पुरवित आहे. बाईक खराब झाल्यास ग्राहक टोलफ्री नंबरवर (844 844 0449) फोन करु शकतात. त्यानंतर एक गाडी त्यांच्याकडे पाठवली जाईल. त्यानंतर तिथून 40 किमी रेंजमध्ये कुठल्याही सर्व्हिस पॉईंटवर ती दुचाकी पोहोचवली जाईल. या व्यतिरिक्त, ग्राहकांना सेवेची वॉरंटी दिली जाईल आणि देशभरात रोड साइड सहाय्य दिले जाईल.

संबंधित बातम्या

तुमची कार आता HP च्या पेट्रोल पंपावर होणार चार्ज, देशभरात EV नेटवर्क तयार

4.5 लाखात घरी न्या ‘ही’ इलेक्ट्रिक कार, बुकिंग सुरु होताच ग्राहकांचा रांगा

30 मिनिटात चार्ज, सिंगल चार्जवर 130KM धावणार, नवी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात

अवघ्या 85 हजारात खरेदी करा 2.13 लाखांची Royal Enfield Thunderbird 500

अवघ्या 26 हजारात खरेदी करा 67 हजारांची Hero Passion Pro

(Detel Easy Plus an electric two-wheeler launches in India in price of Rs 39999)

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.