Renault कडून SUV सह अनेक गाड्यांवर 750000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

रेनॉ (Renault) कंपनीने अलीकडेच जाहीर केले आहे की ते क्विड (Kwid), ट्रायबर (Triber) आणि डस्टर (Duster) या कार्सवर सवलत देत आहे.

Renault कडून SUV सह अनेक गाड्यांवर 750000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट
Renault Cars
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 11:59 PM

मुंबई : रेनॉ (Renault) कंपनी अनेकदा त्यांच्या वाहनांवर बम्पर सूट देत असते. कंपनीने अलीकडेच जाहीर केले आहे की ते क्विड, ट्रायबर आणि डस्टर या कार्सवर सवलत देत आहे. ही सूट एप्रिल 2021 साठी आहे. परंतु नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या रेनॉ कायगर या कारचा या ऑफरमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. कारमेकर कंपनीने काही निवडक व्यावसायिक आणि ग्रामीण ग्राहकांसाठी स्वतंत्र सूट जाहीर केली आहे. (Discount up to Rs 750000 on Renault Cars)

डस्टर या कारबद्दल बोलायचे झाल्यास या कारची किंमत 9.57 लाख ते 13.87 लाख रुपयांपर्यंत आहे. रेनॉ कंपनीने या कारच्या 1.3 लीटर टर्बो वेरिएंटवर 30,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 30,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 15,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस, 30,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 15,000 रुपयांचा ग्रामीण डिस्काऊंट देऊ केला आहे. तर 1.5 लीटर वेरिएंटवरही हीच डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे, केवळ त्यात कॅश डिस्काऊंटचा समावेश करण्यात आलेला नाही.

ट्रायबरवर मोठा डिस्काऊंट

ट्रायबर या कारवरील ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, या कारची किंमत 5.30 लाख ते 7.82 लाख रुपये इतकी आहे. या वाहनावर 25,000 (MY20) आणि 15,000 (MY21) ची रोख सूट देण्यात आली आहे. या गाडीवर 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही उपलब्ध आहे. लॉयल्टी बोनस 10,000 रुपये आणि कॉर्पोरेट तसेच ग्रामीन 10,000 आणि 5000 रुपयांची सूट मिळत आहे. यावर तुम्ही एकूण 55,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

क्विडवर डिस्काऊंट

रेनॉच्या लोकप्रिय क्विड या कारबद्दल बोलायचे झाल्यास, या कारची किंमत 3.12 ते 5.31 लाख रुपयांदरम्यान आहे. या कारवर 20,000 रुपये (MY20) आणि (MY21) साठी 10,000 रुपयांची रोख सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील उपलब्ध आहे. लॉयल्टी बोनसच्या रुपात या कारवर 10,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे, तर कॉर्पोरेट आणि ग्रामीण डिस्काऊंटच्या रुपात 10,000 आणि 5000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. कारवर ग्राहक एकूण 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतची बचत करु शकतात.

Renault India चा जलवा

मार्च 2021 मध्ये रेनॉ इंडियाने 12,356 युनिट्स वाहनांची विक्री साधून देशांतर्गत विक्रीत 277.97 टक्के वाढ नोंदवली आहे. मार्च 2020 मध्ये ऑटोमोबाईल उत्पादकाने देशांतर्गत बाजारात 3,269 युनिट्सची विक्री केली होती. या विक्रीसह भारतीय बाजारातील रेनॉचा हिस्सा (मार्केट शेयर) 3.9 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये तो 2.3 % होता. दरम्यान, कंपनीने पॉझिटिव्ह मंथ ऑन मंथ ग्रोथदेखील साध्य केली आहे. रेनॉ इंडियाच्या विक्रीत सर्वात मोठा वाटा रेनॉ क्विड, रेनॉ ट्रायबर, रेनॉ डस्टर आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या रेनॉ कायगर या गाड्यांचा आहे.

Renault Kwid ची किंमत 3.13 लाख रुपये ते 5.31 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. Renault Triber ची किंमत 5.30 लाख रुपये ते 7.82 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपयांच्या रेंजमध्ये आहे. रेनॉ डस्टर या कारची किंमत 9.57 लाख रुपये ते 13.87 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. तर Renault Kiger ची किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरु होते, या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.72 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे.

इतर बातम्या 

Nissan Magnite की Renault Kiger, विक्रीच्या बाबतीत कोणती कार अव्वल?

Tata Altroz भारतीय बाजारात धुमाकूळ, विक्रीत तब्बल 558 टक्क्यांची वाढ

शानदार लुक, 5 स्टार सेफ्टी रेटिंग, Tata च्या ‘या’ कारला भारतीय ग्राहकांची पसंती

(Discount up to Rs 750000 on Renault Cars)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.