मारूती, ह्युंदाई आणि टाटाच्या या गाड्यांवर मिळत आहे 64 हजारांपर्यंतची सुट

मीडिया रिपोर्ट्सनुसार या महिन्यात मारुती सुझुकीच्या वाहनांवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. मारुतीच्या या कारवर 64 हजारांपर्यंत सुट मिळतेय.

मारूती, ह्युंदाई आणि टाटाच्या या गाड्यांवर मिळत आहे 64 हजारांपर्यंतची सुट
Hyundai i20Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 8:00 PM

मुंबई : जर तुम्ही गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला मारुती सुझुकी (Maruti Suzuki), ह्युंदाई मोटर इंडिया आणि टाटा मोटर्सच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळवण्याची उत्तम संधी आहे (Car Offer). आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा यांच्या कोणत्या मॉडेलवर मेगा ऑफर सुरू आहे त्याबद्दल सांगणार आहोत.

मारुतीच्या या मॉडेल्सवर मिळतेय ऑफर

मीडिया रिपोर्ट्सनुसार या महिन्यात मारुती सुझुकीच्या वाहनांवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. मारुती सियाझवर 28 हजारांपर्यंत, अल्टोवर 38 हजारांपर्यंत, S Presso आणि Alto K10 वर 49 हजारांपर्यंत, 64 हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. वॅगनआर स्विफ्टवर 54 हजारांपर्यंत आणि सेलेरिओवर 44 हजारांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

Hyundai Cars: या मॉडेल्सवर मिळतेय सुट

मार्चमध्ये, Hyundai च्या Grand i10 Nios व्यतिरिक्त, i20 आणि Aura सारख्या मॉडेल्सवर बंपर सूट दिली जात आहे, Hyundai Grand i10 Nios वर 38 हजारांपर्यंत, Hyundai i20 वर 20 हजारांपर्यंत आणि Hyundai Aura वर 33 हजारांपर्यंत सूट दिली जात आहे.

हे सुद्धा वाचा

टाटा कार खरेदी केल्यास 45 हजारांपर्यंतचा फायदा

टाटा मोटर्सदेखील मार्चमध्ये ग्राहकांना उत्तम ऑफर देत आहे, ज्यामुळे तुम्हाला हजारो रुपयांची बचत करता येईल. कंपनी Tata Nexon वर Rs 3,000, Tata Tiago वर Rs 28,000, Tata Harrier आणि Tata Safari वर Rs 45,000, Tata Tigor वर Rs 30,000 आणि Tata Altroz वर Rs 28,000 ची कॉर्पोरेट सूट देत आहे.

ह्युंदाईच्या या वाहनांवर कुठलीच ऑफर नाही

मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये Hyundai च्या Venue, Creta व्यतिरिक्त Alcazar आणि Tucson सारख्या मॉडेल्सवर सूट दिली जात नाही.

मारुती सुझुकीच्या या वाहनांना सवलतीचा लाभ मिळणार नाही

वर, आम्ही तुम्हाला ज्या वाहनांसह सवलतीचा लाभ मिळेल त्याबद्दल माहिती दिली आहे. पण आता आम्ही तुम्हाला अशा मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत ज्यावर डिस्काउंट उपलब्ध नाही आणि हे मॉडेल्स आहेत Baleno, Brezza आणि Grand Vitara.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.