बाईक चालवताना थंडी जाणवते का? जॅकेटमध्ये ठेवा ‘या’ 2 गोष्टी, जाणून घ्या

बाईक चालवताना छातीला थंडावा जाणवल्याने तुम्ही बराच काळ आजारी राहू शकता. छातीला थंडी जाणवल्यास खोकला आणि सर्दीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकदा जॅकेट घालूनही बाईक चालवताना छातीवर थंडावा जाणतोच. अशावेळी तुम्ही अशा टिप्स चा अवलंब करा ज्यामुळे तुम्ही थंडीपासून सुरक्षित राहाल.

बाईक चालवताना थंडी जाणवते का? जॅकेटमध्ये ठेवा 'या' 2 गोष्टी, जाणून घ्या
बाईक चालवताना जॅकेटमध्ये ठेवा 'या' 2 गोष्टी
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 8:46 AM

थंडीच्या दिवसात बाईक चालवणे म्हणजे एक प्रकारची कसरत असते. कारण या दिवसांमध्ये काही ठिकाणी सकाळी खूप धुकं पसरलेलं असतं. त्यामुळे बाईक चालवताना थंडीसोबत धुक्यातून वाट काढणे कठीण होऊन बसते. तर वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे अनेकदा बाईक चालवताना स्वेटर म्हणा किंवा जॅकेट घालून देखील सर्वात जास्त थंडावा हा छातीला जाणवत असतो. बाईक चालवताना छातीला थंड वाऱ्यापासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळयात बाईक चालवताना प्रत्येकजण गरम जॅकेट, हातमोजे,आणि तोंडाला मास्क लावून बाईक चालवतात. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सुद्धा थंडीच्या दिवसात छातीला जास्त थंडावा जाणवल्यास सर्दी, कफ, खोकला होत असतो. तर अशावेळी बाईक चालवताना हे सोपे उपाय करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला छातीला अजिबात थंडी जाणवणार नाही. त्याचबरोबर तुम्ही आरामात बाईक चालवू शकाल.

जॅकेटच्या आता न्यूज पेपर ठेवा

थंडीच्या दिवसात तुम्ही जेव्हा बाईक चालवता तेव्हा थंड वाऱ्यापासून बचाव व्हावा यासाठी जॅकेट घालता, मात्र जॅकेट घालून सुद्धाछातीला थंडावा जाणवत असेल तर तुम्ही जॅकेटच्या आत डब्बल फोल्ड करून वर्तमानपत्र ठेवा. अश्याने जॅकेटच्या आत थंडावा किंवा गार वारा जाणवणार नाही. त्याचबरोबर तुमचे थंडीपासून संरक्षण मिळेल आणि तुम्ही आरामात बाईक चालवून तुमचा प्रवास पूर्ण करू शकतात.

एअर बबल पॉलिथिन हादेखील एक उत्तम उपाय आहे

तुम्हाला जर आणखी एक उत्तम ट्रिक्स ट्राय करायची असल्यास तुम्ही वृत्तपत्राप्रमाणे जॅकेटच्या मधोमध एअर बबल पॉलिथिन देखील ठेवू शकता. असे केल्याने बाईक चालवताना थंड हवा छातीपर्यंत पोहचत नाही. खरं तर एअर बबल पॉलिथिन वृत्तपत्रापेक्षा जास्त जाड असते. याशिवाय पॉलिथिनचा थरही खूप जाड असतो.

ही ट्रिक फार कमी लोकांना माहित आहे. खरं तर थंडीच्या दिवसात सकाळी बाईकवरून ऑफिस किंवा कॉलेजला जाणाऱ्यांसाठी ही एक उत्तम ट्रिक आहे. अशा तऱ्हेने वृत्तपत्र आणि एअर बबल पॉलिथीनचा वापर करून हिवाळ्यात बाईकवरून जाताना थंड हवेपासून स्वत:चा बचाव करू शकता.

धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.