तुम्हीसुद्धा कार सुरू केल्यानंतर लगेच AC सुरू करता? मग हा माहिती खास तुमच्यासाठी
जेव्हाही तुम्ही कारमध्ये एसी सुरू कराल तेव्हा नेहमी आधी इंजिन सुरू करा आणि नंतर एसी सुरू करा. यासाठी प्रथम इंजिनला व्यवस्थित वॉर्म अप होऊ द्यावे.
मुंबई : अनेक जण उन्हाळ्यात एसीशिवाय प्रवास करण्याचा विचारही करत नाही. ज्याप्रमाणे लोकं घरात एसी लावतांना काही गोष्टींची काळजी घेतात, त्याचप्रमाणे कारमध्ये एसी (Tips for car AC) वापरण्याची देखील योग्य पद्धत असते. ज्या लोकांना उष्णतेचा जास्त त्रास होतो, त्यांनी गाडी अगोदर सुरू करावी, काही वेळ एसी चालू द्या आणि मग थंड गाडीत बसा. अनेकजण गाडी सुरू करण्यासोबतच एसी सुरू करतात, पण काही लोकं असे आहेत जे गाडी सुरू केल्यानंतर काही वेळ एसीशिवाय गाडी चालवतात आणि नंतर एसी सुरू करतात. अशा परिस्थितीत, त्यांच्यापैकी सर्वोत्तम मार्ग कोणता हा प्रश्न आहे. मायलेजच्या दृष्टीने कारची देखभाल महत्त्वाचे आहे.
कारमध्ये एसी वापरण्याचे आहेत नियम आहेत
जेव्हाही तुम्ही कारमध्ये एसी सुरू कराल तेव्हा नेहमी आधी इंजिन सुरू करा आणि नंतर एसी सुरू करा. यासाठी प्रथम इंजिनला व्यवस्थित वॉर्म अप होऊ द्यावे. त्याचप्रमाणे गाडी बंद करताना इंजिन थेट बंद करू नये. कार बंद करण्यापूर्वी एसी बंद करा आणि एसी बंद असताना इंजिन बंद केले पाहिजे. तुमची कार बराच वेळ उन्हात उभी असेल तर गाडीत बसल्याबरोबर एसी सुरू करू नये. या स्थितीत प्रथम गाडीचे गेट उघडावे किंवा किमान काही वेळ खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
यानंतर एसी सुरू करावा आणि लक्षात ठेवा की सुरुवातीला कधीही एसी सर्वात वेगवान स्केलवर चालवू नका. एसीचे तापमान किंवा वेग हळूहळू वाढवत राहा. जास्त वेगाने एसी चालवणे कारचे इंजिन आणि मायलेज दोन्हीसाठी चांगले नाही. तुमच्या कारमध्ये एसी असेल तर अनेकदा एसी सुरू ठेवूनच गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. यासोबतच गाडीच्या एसीमध्ये गॅस वगैरे टाकल्यावर त्यासोबत गाडीच्या इंजिन ऑइलचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
गाडीचा एसी चालवताना गाडीत दुर्गंधी येत असेल तर ते बाष्पीभवनात जमा झालेल्या बुरशी किंवा बॅक्टेरियामुळे होते, त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्या. याशिवाय, जर कधी कारमध्ये एसी काम करत नसेल, तर मेकॅनिकला दाखवण्यापूर्वी एसीचा फ्यूज तपासा, कारण अनेकदा एसी यामुळे चालत नाही. याशिवाय एसीमध्ये बाष्पीभवन, फिल्टरमुळे जास्त त्रास होतो, त्यामुळे मेकॅनिककडे जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.