कार ठेवायची नेहमी मेंटेन? मग फॉलो करा या टिप्स
Car Maintenance Tips | इंजिन हे कारचे हार्ट मानण्यात येते. त्यामुळे त्याची नेहमी काळजी घेतली तर तुमची कार धडधाकट राहिल. इंजिन स्वच्छ आणि मजबूत राहण्यासाठी त्यात नेहमी चांगल्या दर्जाचे आणि नामांकित कंपनीचे ऑईल वापरणे आवश्यक आहे. तुम्ही कारचे शौकीन असाल तर कार मेंटेन ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी या टिप्स कामी येतील. त्याआधारे कार असेल एकदम मेंटेन
नवी दिल्ली | 1 नोव्हेंबर 2023 : आपल्या प्रत्येकाचं एक चारचाकी घरासमोर उभी असावी, असं स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण मेहनत करतात. कष्ट उपसतात. बचत करतात. कर्ज घेतात. त्यामुळे कारचे स्वप्न साकारता येते. अनेक जण जुन्या कार सुद्धा खरेदी करतात. कारण नवीन कार अत्यंत महाग आहेत. सर्वच लोकांना या महागड्या कारची खरेदी करता येत नाही. अनेक जण कार खरेदी केल्यानंतर कुटुंबातील सदस्य असं या कारसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यामुळे या कारची चांगली काळजी घेतली तर ती दमदार कामगिरी बजावेल. त्यासाठी कार मेंटेन ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी या टिप्स आणि ट्रिंक कामी येतील.
युझर मॅन्युअल फॉलो करा
कार मेंटेन ठेवण्यासाठी सर्वात अगोदर कारसोबत मिळालेले युझर मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा. त्यातील अनेक गोष्टी बारकाईने तपासा. यामध्ये अनेक गोष्टींची माहिती देण्यात येते. कारसंबंधी सर्व माहिती देण्यात येते. यामध्ये सेफ्टी फीचर्स, रिमोट कंट्रोल, इंजिन ऑईल, टायर आणि इतर माहिती यामध्ये असते. तुमच्याकडे युझर मॅन्युअल नसेल तर कार कंपनीच्या वेबसाईटवरुन ते डाऊनलोड करता येते.
टायर प्रेशरवर ठेवा लक्ष्य
कारचे टायर हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे त्यामध्ये नेहमी प्रेशर मेंटन ठेवणे आवश्यक आहे. टायरमध्ये योग्य हवा नसेल तर ते लवकरच खराब होईल. प्रवासा दरम्यान ते फुटण्याची शक्यता आहे. कारमध्ये नेहमी नायट्रोजन ही भरण्याचा प्रयत्न करा. टायर प्रेशर मायलेजसाठी महत्वाचे आहे.
ऑईल आणि ऑईल फिल्टर
एक कार छोट्या आणि मोठ्या पार्ट्सने मिळून तयार होते. कारचे इंजिन सर्वात महत्वाचे असते. त्यामुळे कार पळवायला ऊर्जा मिळते. इंजिन नेहमी मेंटेन ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी कारच्या इंजिनचे ऑईल आणि ऑईल फिल्टर बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे इंजिनची लाईफ चांगली राहते.
इंजिन स्वच्छ ठेवा
इंजिनला कारचे हार्ट म्हणतात. तुम्हाला त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे इंजिन आतून स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. इंजिन स्वच्छ आणि दमदार ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या कंपनीचे इंजिन ऑईलचा वापर करा. तसेच ते बाहेरुन पण स्वच्छ ठेवल्यास इंजिनची कामगिरी सुधारेल. इंजिन क्लिनरचा वापर करणे फायदेशीर ठरेल.
इंटेरिअर नेहमी ठेवा स्वच्छ
कार बाहेरुन स्वच्छ करण्यासोबतच ती आतून ही स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी बाजारात अनेक वस्तू मिळतात. अनेक स्वच्छतेची उपकरणे मिळतात. साध्या कपड्याने पण आतील भाग स्वच्छ करता येतो. तसेच सुंगधासाठी काही नैसर्गिक सुवासांचा वापर करता येतो.