Electric Car | बुलेटच्या किंमतीत इलेक्ट्रिक कार! काय आहेत फीचर, अशी आहे किंमत

Electric Car | देशात सातत्याने इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. जर तुम्हाला स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल आणि तुम्ही तिचा शोध घेत असला तर तुमचा शोध येथे समाप्त होईल. कारण तुम्हाला बुलेटच्या किंमतीत इलेक्ट्रिक कार खरेदी करता येणार आहे. Yakuza Karishma EV ही कार स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरली आहे.

Electric Car | बुलेटच्या किंमतीत इलेक्ट्रिक कार! काय आहेत फीचर, अशी आहे किंमत
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 11:32 AM

नवी दिल्ली | 25 January 2024 : देशात आता इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती गरज लक्षात घेता अनेक बदल होत आहे. तर अनेक प्रयोग होत आहे. सध्या बड्या कंपन्यांच्या ईव्ही बाजारात येत असल्या तरी त्या सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहेत. टाटा मोटर्सने ईव्ही बाजारात दमदार आघाडी घेतली आहे. तर एलॉन मस्क यांची टेस्ला पण बाजारात येण्याच्या तयारीत आहे. पण ग्राहकांना बजेट ईव्ही कारची प्रतिक्षा आहे. हरियाणातील Yakuza EV ने नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली आहे. या कारची किंमत हिरो मोटोकॉर्पच्या करिझ्मा या बाईक पेक्षा पण कमी आहे.

ही तर Nano EV

देशातील एका मोठ्या वर्गाला ईलेक्ट्रिक कारचे वेड आहे. पण बजेट जास्त असल्याने तसेच इतर तांत्रिक बाबीमुळे हा वर्ग इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास धजत नसल्याचे दिसून येत आहे. पण आता स्वस्त इलेक्ट्रिक कारसाठी फार वाट पाहावी लागणार नाही. बाजारात Yakuza Karishma EV दाखल झाली आहे. ही तीन सीटर इलेक्ट्रिक कार चर्चेचा विषय ठरली आहे. काय आहेत या कारची वैशिष्ट्ये, जाणून घ्या…

हे सुद्धा वाचा

Yakuza Karishma EV चे फीचर्स

Yakuza Karishma एक 3 सीटर इलेक्ट्रिक कार आहे. या कारचा लूक आणि डिझाईन एकदम मनमोहक आहे. ही इलेक्ट्रिक कार LED DRLs, प्रोजेक्टर हँडलँप, LED फॉग लँप, ब्रॉड ग्रिल, क्रोम डोर हँडल, कनेक्टेड LED टेललँप, पॉवर विंडो, बॉटल होल्डर्स सारखे फीचर्स यामध्ये आहेत. यामध्ये ग्राहकांना सनरूफ, पुश स्टार्ट/स्टॉप बटन, स्पीकर्स, ब्लोअर, इंस्ट्रूमेंट डिस्प्ले, रिव्हर्स पार्किंग कॅमरा सारख्या सुविधा पण उपलब्ध आहेत.

Yakuza Karishma EV ची बॅटरी आणि रेंज

याकुझाच्या इलेक्ट्रिक कारमध्ये 60v42ah बॅटरी पॉवर मिळते. एकदा फुल चार्ज झाल्यावर ही कार 50-60 किलोमीटरचा पल्ला गाठते. या कारला 0 ते 100 टक्के चार्जिंग करण्यासाठी 6-7 तास लागतात. ही इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी Type 2 चार्जरचा वापर करण्यात येतो. या कारची बुकिंग सुरु झाली आहे. कंपनीच्या अधिकृत साईटवर जाऊन तुम्ही हे बुकिंग करु शकता.

बाईकपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार

देशात Hero Karizma XMR ची एक्स शोरुम किंमत 1.79 लाख रुपयांपासून सुरु होते. तर ही इलेक्ट्रिक कार त्यापेक्षा पण स्वस्त आहे. Yakuza Karishma ची किंमत त्यापेक्षा स्वस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही कार बुक करु शकता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.