Electric Car : शाहरुख खानपासून ते जॅकलिनपर्यंत हे स्टार वापरतात इलेक्ट्रीक कार, पाहा कोणाकडे कोणती E – CAR
भारतात सामान्यजनांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत आता इलेक्ट्रीक कारच्या प्रेमात पडले आहेत. पेट्रोल आण डिझेलच्या वाहनांस आता इलेक्ट्रीक कारची देखील मागणी वाढत चालली आहे. कोणत्या स्टारकडे कोणती इलेक्ट्रीक कार आहे हे पाहूयात
भारतासह जगभरात आता वाढते प्रदुषण आणि वाढते इंधन दर पाहून इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली आहे. सर्वसामान्यामध्ये देखील आता हळूहळू इलेक्ट्रीक कारला घेण्याचा कल वाढत आहे. परंतू इलेक्ट्रीक कार तशा महागच आहेत. परंतू बॉलिवूडच्या स्टारमंडळींना कसली आलीय पैशांची कमी. त्यामुळे बॉलिवडूचे तारे देखील आता इलेक्ट्रीक कारच्या प्रेमात पडले आहेत. अनेक स्टार आता इलेक्ट्रीक कारवर भरवसा ठेवताना दिसत आहेत. कोणत्या बॉलिवू़ड स्टारकडे कोणती इलेक्ट्रीक कार आहे हे या बातमीत पाहुयात…
शाहरुखजवळ आहे ही इलेक्ट्रीक कार
बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याच्या दिमतीला देखील इलेक्ट्रीक कार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार शाहरुख खान याच्या जवळ हुंडईची सुंदर इलेक्ट्रीक कार आहे. हुंडईच्या या कारच्या मॉडेलचे नाव Ioniq5 आहे. Hyundai कंपनीने ही कार शाहरुख खान गिफ्ट दिली आहे. भारतात या गाडीला Auto Expo 2023 मध्ये लॉंच केले होते.
जॅकलिन फर्नांडिस
बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन हीच्याकडे देखील इलेक्ट्रीक कार आहे. तिला इलेक्ट्रीक कारमधून फिरायला खूप आवडते. जॅकलिन हिच्याकडे जर्मनीचे कार कंपनी BMW ची लक्झरी इलेक्ट्रीक कार i7 आहे.
रेखा यांच्याकडे देखील इलेक्ट्रीक कार
हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्याकडे देखील इलेक्ट्रीक कार आहे. रेखा यांच्याकडे देखील BMW i7 ही इलेक्ट्रीक कार आहे. जिची किंमती कोट्यवधी रुपये आहे. या कारला 101.7 kwh क्षमतेची बॅटरी असते. ज्यामुळे एका चार्जिंगमध्ये ती 625 किलोमीटरपर्यंत धावते असे म्हटले जाते.
रितेश देशमुख
मिडीयातील बातमीनूसार रितेश देशमुख याला देखील इलेक्ट्रीक कारची क्रेज आहे. त्याच्याकडे महागड्या टेस्लाच्या इलेक्ट्रीक कार मॉडेल x आणि BMW ची ix देखील आहेत. त्यामुळे रितेश भाऊ भारतातील निवडक व्यक्ती पैकी एक आहेत, ज्यांच्याकडे महागडी ईलोन मस्क यांच्या कंपनीची टेस्ला इलेक्ट्रीक कार आहे.
सुनील शेट्टी
बॉलीवूडचे अण्णा म्हणजे सुनील शेट्टी हो. सुनील शेट्टीला देखील महागड्या इलेक्ट्रीक कारचा शौक आहे. ब्रिटीश कार कंपनी एमजी मोटर्सच्या सर्वात किफायतशीर म्हटल्या जाणाऱ्या Comet या इलेक्ट्रीक कारला सुनील शेट्टी यांनी नुकतेच खरेदी केले आहे.
सुनील शेट्टी आणि रेखा यांची इलेक्ट्रीक कार पाहा –