बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भारतात लाँच, किंमत फक्त…

जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने (JLRI) मंगळवारी मोस्ट अवेटेड जॅग्वार आय-पेस (Jaguar I-Pace) भारतात लँच केली आहे.

बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भारतात लाँच, किंमत फक्त...
Electric Jaguar I Pace
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 1:36 PM

मुंबई : जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने मंगळवारी मोस्ट अवेटेड जॅग्वार आय-पेस (Jaguar I-Pace) भारतात लँच केली आहे. या कारची किंमत 1.06 कोटी रुपये ते 1.12 कोटी रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे. मर्सिडीज-बेंझ ईक्यूसी नंतर जॅग्वार आय-पेस ही देशातील दुसरी लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही बनली आहे. जेएलआर इंडियाने नोव्हेंबर 2020 पासून या ई-एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. (Electric Jaguar I-Pace Launched in India; check Price, specs and Features)

जॅग्वार आय-पेस ही कार ब्रिटीश लक्झरी कार निर्माता कंपनीचं प्रमुख उत्पादनं आहे. एसयूव्हीने 2019 चा वर्ल्ड कार ऑफ द इयर, वर्ल्ड कार डिझाईन ऑफ दी इयर आणि वर्ल्ड ग्रीन कार यासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. याव्यतिरिक्त, जॅग्वार आय-पेस ही पहिली कार आहे जिने एकाच वेळी तीनही वर्ल्ड कार विजेतेपदं जिंकली आहेत. या कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास जॅग्वार आय-पेस अतिशय स्मूद लुकसह सादर करण्यात आली आहे. यात सिग्नेचर जॅग्वार ग्रिल, एलईडी हेडलॅम्प्स आणि शानदार एअर इन्टेक्स आहेत. याच्या हेडलॅम्प्समध्ये मॅट्रिक्स तंत्रज्ञान उपलब्ध आहे जेणेकरुन ड्रायव्हरला येणाऱ्या ट्रॅफिकची चिंता करावी लागणार नाही. मागील बाजूस एलईडी टेल लॅम्प्स आणि कूप-एस्क रूफ सह शानदार लुक देण्यात आला आहे.

45 मिनिटात 80 टक्के चार्ज होणार

लँड रोवर डिफेंडरचे डिजिटल वेरिएंट सादर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता भारतात कंपनीने Jaguar I-Pace ही शानदार कार लाँच केली आहे. Jaguar I-Pace मध्ये 90kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे जी 100kW रॅपिड चार्जरद्वारे 80 टक्के चार्ज करण्यासाठी केवळ 45 मिनिटं लागतील. या गाडीमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे 400 पीएस पॉवर देते. कंपनीने आय-पेसच्या ग्राहकांना चार्जिंगची बेस्ट सुविधा देण्यासाठी टाटा पॉवरशी भागीदारी केली आहे.

बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी

आय-पेस च्या 90 केडब्ल्यूएच लिथियम आयन बॅटरीवर 8 वर्षांची किंवा 1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी दिली आहे. सोबतच आय-पेसचं पाच वर्षांसाठी सर्विस पॅकेज दिलं जाईल. ही कार तीन वेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये एस, एसई आणि एचएसई अशी या तीन वेरिएंट्सची नावं आहेत. ही कार 4.8 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते. जॅग्वार आय-पेसच्या फ्रंट साईडला दोन सिंक्रोन्स मॅग्नेटिक इलेक्ट्रिक मोटर्ससह रियर एक्सलही मिळेल, जे 696 एनएम पीक टॉर्कसह 395 बीएचपी पॉवर आउटपुट जनरेट करेल. यामध्ये AWD (All-wheel drive) सिस्टिमही दिली ही. ही कार 480 हून अधिक किलोमीटपर्यंतची रेंज देईल.

Electric Jaguar I-Pace काय आहे खास?

  1. >> जॅग्वार I-Pace च्या केबिनमध्ये लेटेस्ट Pivi Pro इन्फोटेनमेंट सिस्टिमसह फ्युचरिस्टिक मिळेल. 10 इंचांच्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिममध्ये Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिविटी मिळते.
  2. >> कारमध्ये एक स्लोपिंग बोनट, एलईडी हेडलॅम्प्स, हनीकॉम्ब पॅटर्न ग्रिल आणि डिटेल्ड सेंटर एअर-डॅम आहे. या इलेक्ट्रिक वाहनात आकर्षक दिसणारे सेट्स आणि हलके ORVM (Outside Rear-view Mirror) देखील मिळतील.
  3. >> या इलेक्ट्रिक एसयूव्हीची लांबी 4682 मिमी, रुंदी 2011 मिमी आणि उंची 1566 मिमी आहे. व्हीलबेस आणि ग्राउंड क्लीयरन्स 2990 मिमी आणि 174 मिमी आहे.
  4. >> ही कार फूजी व्हाइट, कॅल्डेरा रेड, सॅन्टोरीनी ब्लॅक, युलाँग व्हाइट, इंडस सिल्व्हर, फिरेंज रेड, सेझियम ब्लू, बोर्स्को ग्रे, आयगर ग्रे, पोर्टोफिनो ब्लू, फर्लेन्डो पर्ल ब्लॅक आणि अरुबा कुलसह एकूण 12 रंगांमध्ये सादर केली जाणार आहे.
  5. >> आय-पेस इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स (केवळ एचएसई), 8 वे सेमी पावर्ड लक्सटेक स्पोर्ट सीट, 380W मेरिडियन साऊंड सिस्टम, इंटरअॅक्टिव्ह ड्रायव्हर डिस्प्ले, 3 डी सराउंड कॅमेरा, ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर, अ‍ॅनिमेटेड डायरेक्शन इंडिकेटर, लेदर स्पोर्ट सीट्स, 825W मेरीडियन 3 डी सराउंड साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, अडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

Audi ची दमदार कार भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

सिंगल चार्जवर 100KM धावणार, Komaki ची इलेक्ट्रिक बाईक भारतात लाँच

Petrol ची टाकी फुल करण्याचं टेन्शन खल्लास, सिंगल चार्जमध्ये 60KM मायलेज देणारी इलेक्ट्रिक बाईक भेटीला

(Electric Jaguar I-Pace Launched in India; check Price, specs and Features)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.