रफ अँड टफ मोटारसायकल कंपनी रॉयल एनफिल्डने मोटोवर्स 2024 मध्ये त्यांची बहुप्रतिक्षित असलेली एनफिल्ड क्लासिक 350 बाईक उतरवली आहे. ही बाईक आता नवीन व्हर्झन आहे. त्यात बॉबर इस्पायर्ड बॉडी स्टाईल देण्यात आली आहे. या बाईकमध्ये स्टँडर्ड क्लासिक 350 मधील मॅकेनिकल कंपोनेंट्स कायम ठेवण्यात आले आहेत. भारतीय बाजारात कंपनीने रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक 350 ला 2.35 लाख रुपये एक्स शोरूम किंमतीत लाँच केले आहे.
एकदम धासू फीचर्स
या डबल क्रॅडल फ्रेम गोअन क्लासिक 350 बाईकमध्ये पुढील बाजूने टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूला ट्विन साईडेड शॉक ऑब्जॉर्बर आहे. या बाईकच्या पुढील बाजुला एक गिअर तर एक रिअर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. ड्युअल चॅनल ABS सिस्टममुळे बाईक सुरक्षितता वाढली आहे. या बाईकमध्ये फ्लोटिंग रायडर सीट आणि एक्सपोज्ड रिअर फेंडर देण्यात आले आहे. या सर्व अपडेटमुळे या बाईकचा चेहरा-मोहरा बदलला आहे. तिला आकर्षक लूक आला आहे.
ही पण खास वैशिष्ट्ये
रेट्रो स्टाईल गोअन क्लासिक 350 रॉयल एनफिल्डमध्ये 170 मिमीचा ग्राऊंड क्लिअरेंस देण्यात आला आहे. याशिवाय एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर्स, क्लासिक क्लच आणि ब्रेक लीवरसह एक सेमी-डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. तर या मोटरसायकलमध्ये 349CC चे एअर कुल्ड सिंगल सिलेंडर फ्यूल इंजिक्टेड इंजिन देण्यात आले आहे.
Guerrilla 450 मैदानात
रॉयल एनफिल्डने Guerrilla 450 ही जबरदस्त लूक असलेली बाईक पण मैदानात उतरवली आहे. ही बाईक ब्राँझ रंगात बाजारात आणली आहे. रॉयल एनफिल्डची नवीन गुरिल्ला 450 ब्लूटूथ आणि नॅव्हिगेशन सारख्या फीचर्समुळे चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वी ही बाईक ब्रावा ब्लू, येलो रिबन, गोल्ड डिप, प्लाया ब्लॅक आणि स्मोक या रंगात न्हाऊन निघालेली आहे. या मोटारसायकलची किंमत 2.39 लाख रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही बाईकच्या किंमती अधिक असली तरी त्यांची क्रेझ कमी झालेली नाही. अगदी निमशहरात पण या बाईकची मागणी वाढलेली आहे.