भारतातील प्रवासी वाहनांची निर्यात वाढली.. मारुती सुझुकी होती निर्यातीत आघाडीवर
वाहन उद्योगाची संघटना असलेल्या SIAM च्या ताज्या आकडेवारीनुसार 2021-22 या आर्थिक वर्षात भारतातून प्रवासी वाहनांच्या निर्यातीत 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुती सुझुकी इंडिया निर्यातीत आघाडीवर होती.
नवी दिल्लीः कार निर्माते मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड यांनी गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या निर्यातीत (Exports of vehicles) उद्योगाचे नेतृत्व केले, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सियाम) ने बुधवारी सांगितले. SIAM ने जारी केलेल्या निर्यातीच्या आकडेवारीनुसार (According to export statistics), मारुती सुझुकीने 18,216 युनिट्स (एप्रिल 2021 मध्ये 17,131 युनिट्स) पाठवल्या होत्या, तर Hyundai Motors ने गेल्या महिन्यात 12,200 युनिट्स (10,201 युनिट्स) निर्यात केल्या होत्या. आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये एकूण प्रवासी वाहन (PV) निर्यात 5,77,875 युनिट्स होती, तर 2020-21 मध्ये हा आकडा 4,04,397 युनिट्स होता. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या आकडेवारीनुसार, प्रवासी कार सेगमेंटने 42 टक्क्यांच्या वाढीसह 3,74,986 युनिट्सची निर्यात केली. त्याच वेळी, युटिलिटी ऑटो विभागातील (In the Utility Auto section) निर्यात 46 टक्क्यांनी वाढून 2,01,036 युनिट्सवर पोहोचली आहे.
निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई
व्हॅनची निर्यात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 1,648 युनिट्सवरून 2021-22 मध्ये 1,853 युनिट्सपर्यंत वाढली. निर्यातीच्या बाबतीत, मारुती सुझुकी इंडिया (MSI) आघाडीवर आहे, त्यानंतर Hyundai Motor India आणि Kia India आहे. MSI ने समीक्षाधीन कालावधीत 2,35,670 प्रवासी वाहनांची निर्यात केली, जी मागील आर्थिक वर्षाच्या दुप्पट आहे.
मागील महिन्यात इतर प्रवासी वाहनांची निर्यात
मागील महिन्याचील निर्यातीत, होंडा कार्स इंडिया लिमिटेड 2,034 युनिट्स, एफसीए इंडिया ऑटोमोबाईल्स 366 युनिट्स, किया मोटर्स इंडिया 8,077 युनिट्स, महिंद्रा अँड महिंद्रा 693 युनिट्स, निसान मोटर इंडिया 1,229 युनिट्स, रेनॉल्ट इंडिया 917 युनिट्स, टोयोटा किर्लोसकर 4 युनिट्स आणि फोक्सवॅगन इंडिया 2,802 युनिट्स. SIAM डेटानुसार, गेल्या महिन्यात उत्पादकांनी 307,506 युनिट्स (305,952 युनिट्स) आणल्या आणि विकल्या – देशांतर्गत 251,581 युनिट्स (261,633 युनिट्स) आणि 46,548 युनिट्स (42,017 युनिट्स) निर्यात केली.
प्रवासी वाहनांची विक्री अजूनही कमीच
SIAM महासंचालक राजेश मेनन म्हणाले की, “प्रवासी वाहनांची विक्री एप्रिल 2017 च्या आकडेवारीपेक्षा अजूनही कमी आहे, तर दुचाकी वाहनांची विक्री एप्रिल 2012 च्या आकडेवारीपेक्षाही कमी आहे. तीनचाकी वाहने अद्याप सामान्य पातळीपर्यंत पोहोचू शकलेली नाहीत, कारण विक्री एप्रिल 2016 च्या आकडेवारीपेक्षा 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. सप्लायर इकोसिस्टमचे व्यवस्थापन चपळता आणि लवचिकतेसह करण्यासाठी उत्पादक कठोर परिश्रम घेत आहेत, कारण उद्योगासाठी पुरवठा बाजूची आव्हाने कायम आहेत. पुढे, रेपो-दरांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे उत्पादक मागणीवरील संभाव्य परिणामाचे निरीक्षण करत आहेत, कारण यामुळे ग्राहकांना कर्जाचे दर वाढतील. सियामच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात तीन चाकी वाहनांची विक्री 20,938 युनिट्स होती आणि दुचाकींची विक्री 1,148,696 युनिट्स होती.