FADA Report : एप्रिलमध्ये प्रवासी वाहनांची विक्री 25 टक्के वाढली, FADA रिपोर्ट काय सांगतो? जाणून घ्या…

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशने (FADA) एप्रिल 2022चे ऑटोमोबाईल उद्योगील प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत.

FADA Report : एप्रिलमध्ये प्रवासी वाहनांची विक्री 25 टक्के वाढली, FADA रिपोर्ट काय सांगतो? जाणून घ्या...
Image Credit source: social
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 4:10 PM

मुंबई :  ऑटोमोबाईल उद्योग संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (FADA) आकडेवारीवरून असं दिसून आलंय की गेल्या दोन वर्षांत सर्व क्षेत्रातील विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोना (Corona) काळानंतर पहिल्यांदाच कारची (Car) विक्रीही जास्त आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहनातील विक्री सध्या चांगल्या पातळीवर असल्याचा अंदाज आहे. एप्रिल 2022 मध्ये भारतात 2 लाख 64 हजार 342 प्रवासी चारचाकी वाहनांची विक्री झाली. कोरोना निर्बंध लागू असताना एप्रिल 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 2 लाख 10 हजार  682 कारच्या तुलनेत ही 25.47 टक्क्यांची लक्षणीय वाढ आहे.

ट्रॅव्हल इंडस्ट्री जोरात

उल्लेखनीय म्हणजे कोरोनाच्या येण्याआधी एप्रिल 2019 मध्ये विकल्या गेलेल्या 2 लाख 36 हजार 217 युनिटच्या तुलनेत ही 11.91 टक्क्यांनी वाढ झाली आहे. FADA चं म्हणणं आहे की बहुतेक क्षेत्रे उघडल्यानं आणि संभाव्य खरेदीदार आता कामासाठी आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळे विक्रीची ही वाढ आहे. ट्रॅव्हल इंडस्ट्री नुकतीच जोर पकडण्याच्या बेतात आहे. यामुळे कार आणखी आकर्षक आणि चांगल्या होऊ लागल्या आहे. यामुळे विक्री देखील वाढते आहे.

काही महत्वाचे आकडे

  1. दुचाकी विक्री एप्रिल 2021 मध्ये 8 लाख 65 हजार 628 युनिट्सच्या तुलनेत दुचाकींची किरकोळ विक्री एप्रिल 2022 मध्ये 38 टक्क्यांनी वाढून 11 लाख 94 लाख 520 युनिट झाली.
  2. तीनचाकी वाहनांची विक्री गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत तीनचाकी वाहनांच्या विक्रीत 96 टक्के वाढ झाली आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. ट्रॅक्टरच्या विक्रीत 26 टक्के वाढ झाली आहे.
  5. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 52 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
  6. एप्रिल 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 51 हजार 515 युनिटच्या तुलनेत गेल्या महिन्यात 78 हजार 398 युनिट्सची विक्री झाली.
  7. LCV, MCV आणि HCV सह या विभागातील सर्व श्रेणींमध्ये विक्री सकारात्मक होती.

अधिक वाढीचा दर

ADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, “एप्रिल महिन्यात मार्च’22 प्रमाणेच ऑटो रिटेलचे आकडे पाहायला मिळाले. एप्रिल’21 ची वर्षभराची तुलना करताना सर्व प्रकारच्या गाड्यांचा अधिक वाढीचा दर मिळतो. हे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या की कोरोना लाटेच्या फेज 1 आणि 2 मुळे एप्रिल’21 आणि एप्रिल’20 दोन्ही देश लॉकडाऊनमुळे प्रभावित झाला होता. त्यामुळे त्यावेळी नगण्य व्यवसाय दिसून आला. त्यामुळे एप्रिल’19 ची चांगली तुलना होईल जी सामान्य प्री-कोरोना होती. एप्रिल ’22 आणि एप्रिल’19 ची तुलना दर्शवते की आम्ही अजूनही वाईट काळातून बाहेर नाही आहोत कारण एकूण किरकोळ विक्री वजा 6 टक्क्यांनी कमी झाली आहे.” मात्र, नजीकच्या काळात माफक प्रमाणात सुधारणा होण्याची आशा दिसून येते आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.