Honda : XUV700 ला टक्कर देण्यासाठी SUV Honda N7X, किंमत आणि नवे फीचर्स जाणून घ्या…

होंडा कंपनी येत्या काळात भारतात SUV Honda N7X लाँच करण्याच्या तयारी आहे. जाणून घ्या या कारविषयी...

Honda  : XUV700 ला टक्कर देण्यासाठी SUV Honda N7X, किंमत आणि नवे फीचर्स जाणून घ्या...
SUV Honda N7XImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 11:10 AM

मुंबई : कोरोनाकाळानंतर (Corona) सर्वच क्षेत्र आता बऱ्यापैकी रुळावर आले आहेत. त्यामध्ये ऑटो क्षेत्र देखील मागे नाहीये. वेगवेगळ्या दिग्गज कंपन्या आपापले नवे उत्पादनं बाजारात आणत आहे. भारतीय बाजारपेठेसह विदेशी बाजारपेठेत (foreign markets) भारतीय ऑटो उत्पादनांना मोठी मागणी आहे. भारतात (India) वेगवेगळ्या आकाराच्या SUV च्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. कार कंपन्या दररोज कॉम्पॅक्ट आणि मध्यम आकाराच्या SUV आणत आहेत. आता भारतातील Tata Motors, Hyundai Motors, Kia Motors आणि Mahindra सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी Honda सुद्धा एक नवीन SUV Honda N7X येत्या काळात लाँच करणार आहे. Honda ची ही मध्यम आकाराची SUV Hyundai Creta, Kia Seltos, Mahindra XUV700 आणि Tata Harrier सह इतर SUV सोबत स्पर्धा करेल. लाँचपूर्वी Honda N7X ची अपेक्षित किंमत आणि वैशिष्ट्यांसह सर्व महत्त्वाचे तपशील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वी दिल्ली.

दमदार फीचर्स

होंडाने गेल्या वर्षी आपली नवीन SUV Honda N7X उतरवली. ही SUV उत्तम लुक तसेच दमदार फीचर्सने सुसज्ज आहे. Honda ची आगामी SUV 5 सीटर आणि 7 सीटर पर्यायांमध्ये सादर केली जाऊ शकते. त्याच्या लूक आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास Honda N7X ला सरळ आकारासह मोठे मल्टी-स्लॅट क्रोम ग्रिल, LED हेडलॅम्प, L-आकाराचे LED DRLs आणि Honda City आणि Civic Premium sedans सारख्या बंपरमध्ये फॉग लॅम्प मिळतील. स्पोर्टी दिसणार्‍या एसयूव्हीला मोठ्या ग्रीनहाऊससह झेड-आकाराचे टेललॅम्प, ड्युअल टोन डोअर माउंटेड विंग मिरर आणि मल्टी-स्पोक अलॉय व्हील मिळतील.

इंजिन-पॉवर आणि वैशिष्ट्ये

Honda N7X SUV 1.5-लीटर पेट्रोल इंजिनसह दिली जाऊ शकते. Honda ची आगामी SUV 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह पाहिली जाऊ शकते. Honda N7X S, E, Prestige आणि Prestige HS सारख्या ट्रिम पर्यायांसह ऑफर केली जाऊ शकते. त्याच वेळी, वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर Honda N7X मध्ये मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम एकाधिक एअरबॅग्जसह अनेक मानक आणि सुरक्षा वैशिष्ट्ये पाहिली जाऊ शकतात. Honda N7X भारतात रु. 12 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या श्रेणीसह ऑफर केली जाऊ शकते. आगामी काळात कंपनी आपल्या आगामी SUV बाबत अधिकृत विधान जारी करू शकते.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.