पावसाळ्याच्या दिवसांत गाडीला गंज? घरबसल्या करा बाइक चकाचक; वाचा टिप्स…
गाडीच्या कोणत्याही पार्टला गंज लागल्यास कालांतराने त्याची झीज होते. गंजापासून होणारे गाडीचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
नवी दिल्ली : पावसाळ्याच्या दिवसांत वाहनप्रेमींना लाँग राइडचे (Long ride) वेध लागतात. वाफाळलेला चहा आणि भज्यांसोबत राइडचा मनमुराद आनंद लुटता येतो. मात्र, तुमच्या राइडच्या आनंदावर तुमच्या काही चुकांमुळे विरजण पडण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या दिवसांत (Rainy season) वाहनांना गंज लागण्याची अधिक शक्यता असते. प्रत्येकवेळी वाहन आडोशाला किंवा शेडमध्ये सुरक्षित ठेवणं शक्य नसतं. त्यामुळे तुमच्या बाईकला गंजापासून (Anti rust effect) बचाव करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गाडीच्या कोणत्याही पार्टला गंज लागल्यास कालांतराने त्याची झीज होते. गंजापासून होणारे गाडीचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. तुम्ही टिप्स फॉलो केल्यास आर्थिक भुर्दंडापासून निश्चितच सुटका होईल. पावसाळ्याच्या दिवसांत गंजापासून गाडीचं संरक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी बाजारात काय काय उपलब्ध आहे, याची थोडी माहिती घेऊ…
गंजरोधक ग्रीस
गंजापासून गाडीला दूर ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ग्रीसचा वापर. बाजारात उपलब्ध AP-3 ऑटोमोटिव्ह ग्रेड ग्रीसचा वापर परिणामकारक ठरू शकतो. ग्रीस जेल स्वरुपात उपलब्ध असते. तुम्ही गाडीच्या विविध पार्टला ग्रीस थेटपणे लावू शकतात. विशेषत: तुम्ही नट-बोल्ट आदीवर ग्रीसचा वापर अधिक करावा. या ग्रीसमुळे वाहनाच्या पार्टवर लेअर बनतात. त्यामुळे गंजरोधक म्हणून प्रभावी ठरतात. तुमची गाडी पावसात भिजली तरीही AP-3 ग्रीस लेअरमुळे गंजापासून संरक्षण होते.
गंजप्रतिरोधक स्प्रे
अँटी रस्ट स्पे गंजापासून संरक्षण करण्याचा सर्वोत्तम पर्याय ठरतो. ग्रीसचा वापर वाहनाच्या आतील पार्टवर करता येत नाही. त्यामुळे अशा स्थितीत अँटी-रस्ट स्प्रे परिणामकारक ठरेल. तुम्ही स्प्रेची फवारून वाहनाच्या आतील भागांवर ग्रीसचा लेअर बनवू शकतात. पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येक 15-20 दिवसाला स्प्रेचा वापर नियमित करावा. तर पावसाळ्याच्या व्यतिरिक्त 30-45 दिवसांत निश्चितपणे तुम्ही स्प्रे वापरू शकतात.
मेटल पॉलिश
पावसाळ्याच्या दिवसांत गाडीचे संरक्षण करण्यासाठी मेटल पॉलिश सर्वोत्तम पर्याय ठरतो. पॉलिस पेस्टला कपड्यांच्या सहाय्यानं गाडीच्या विविध भागांवर तुम्ही लावू शकतात. मात्र, पॉलिश करताना हे महत्वाचं ठरतं की वाहनाच्या भागांत पूर्णपणे पेस्टचा लेअर होईपर्यंत पॉलिश करावी.