Car Tips : इंधन खर्च खूप वाढलाय ? ‘या’ टिप्सनी वाढवा कारचे मायलेज, पेट्रोल-डिझेल वरील खर्चात होईल कपात
Increase Car Mileage: तुम्हाला तुमच्या कारचे मायलेज वाढवायचे असेल तर या सोप्या युक्त्या फॉलो करा. या युक्त्यांच्या मदतीने तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलवर जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
नवी दिल्ली : आजकाल बहुतांश लोकांकडे कार (car) अथवा गाडी असतेच. पण लोकं त्यांच्या कारच्या मायलेजबद्दल (mileage) खूप चिंतित असतात. अशा परिस्थितीत त्यांचा पैसा पेट्रोल (petrol) आणि डिझेलवर (diesel) जास्त खर्च होतो, त्यामुळे त्यांचे बजेट बिघडते. आज आपण अशाच काही पद्धतींबद्दल जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारचे मायलेज वाढवू शकता. तुम्हाला तुमच्या कारचे मायलेज वाढवायचे असेल तर या ट्रिक्स फॉलो करा. या युक्तीच्या मदतीने तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलवर जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. अशा परिस्थितीत तुमचे बजेटही खराब होणार नाही.
एअर फिल्टरची करा तपासणी
कारच्या एअर फिल्टरमध्ये कचरा साचल्याने त्याचे मायलेज कमी होते. अशा स्थितीत त्यामुळे इंजिनवर जास्त दबाव येतो आणि कारचे मायलेज कमी होते. हे टाळण्यासाठी तुम्ही गाडीच्या एअर फिल्टरची वेळोवेळी तपासणी करत राहणे महत्वाचे ठरते.
टायरमध्ये Nitrogen हवा भरावी
कारच्या टायरमध्ये हवा कमी असल्याने कारचे मायलेजही कमी होते. अशा स्थितीत गाडीच्या टायर्समधील हवा शिल्लक राहील याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही ही काळजी घेतली तर तुम्ही कारचे मायलेज 3 टक्क्यांपर्यंत नियंत्रित करू शकता. कारचे मायलेज वाढवण्यासाठी टायरमध्ये सामान्य हवेऐवजी नायट्रोजन हवा भरा.
ब्रेक आणि एक्सलरेटरचा वापर
बर्याच वेळा ट्रॅफिकमध्ये किंवा सिग्नलवर घाई करणारे लोक वारंवार ब्रेकचा वापर करतात अथवा वेगवान ऍक्सिलरेटर घेतात. अशा स्थितीत इंजिन जास्त इंधन वापरायला लागते त्यामुळे कारचे मायलेज कमी होऊ लागते. जर तुम्ही ब्रेक कमी वापरला आणि वेग वाढवला तर कार जास्त मायलेज देईल.
कारचा स्पीड मेंटेन करा
कारच्या मायलेजमध्ये वेग सर्वात जास्त भूमिका बजावतो. कार नेहमी 45 ते 60 किमी प्रतितास या वेगाने चालवली पाहिजे. अशा स्थितीत दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कधी कधी इतक्या वेगाने कार चालवणे सोपे नसते. पण कार जास्त वेगाने किंवा खूप हळू चालवल्याने त्याच्या मायलेजवरही वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत तुम्ही गाडी फार वेगाने चालवू नये किंवा खूप हळूही चालवू नये.
वेळोवेळी कारचे सर्व्हिसिंग करावे
जर तुम्हाला कारचे मायलेज वाढवायचे असेल, तर तुम्ही वेळोवेळी कारची सर्व्हिसिंग करून घ्या. योग्य वेळी सर्व्हिसिंग केल्याने गाडीचे इंजिन आणि त्याचे इतर भाग व्यवस्थित काम करतात. अशा परिस्थितीत, कारचे मायलेज चांगले झाल्यानंतर, इंजिन कमी इंधन खर्च करते. त्यामुळे इंधनावरील खर्चही कमी होतो.