सिंगल चार्जमध्ये 483 किमी रेंज, Ford च्या ‘या’ गाडीसाठी ग्राहकांच्या रांगा, एका दिवसात 20,000 बुकिंग्स

Ford F 150 लाईटनिंग (Ford F 150 Lightning) ही कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील आतापर्यंतची सर्वात बेस्ट गाडी आहे.

सिंगल चार्जमध्ये 483 किमी रेंज, Ford च्या 'या' गाडीसाठी ग्राहकांच्या रांगा, एका दिवसात 20,000 बुकिंग्स
Ford F 150 Lightning
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:22 PM

मुंबई : Ford F 150 लाईटनिंग (Ford F 150 Lightning) ही कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील आतापर्यंतची सर्वात बेस्ट गाडी आहे. अमेरिकेच्या बाजारात या वाहनाने आता वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी आपण अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेनसुद्धा या कारमध्ये बसलेले पाहिले आहेत. दरम्यान, अवघ्या 24 तासात या गाडीला तब्बल 20 हजार बुकिंग्स मिळाल्या आहेत. (Ford F 150 Lightning gets 20,000 bookings in single days, can run 483 KM in single charge)

फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम Farley यांनी एका मुलाखतीत बुकिंगच्या आकडेवारीची पुष्टी केली. Ford F 150 लाइटनिंगची किंमत 39,974 डॉलर्स (29,14,778) इतकी आहे. त्याच वेळी, XLT आणि रेंज टॉपिंग प्लॅटिनम व्हेरिएंट्सच्या किंमती $ 52,974 आणि $ 90,474 पासून सुरू होतात. बॅटरीवर चालणाऱ्या या पिक अप ट्रकने आतापर्यंत जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे

फोर्ड कंपनी सध्या फोक्सवॅगन आणि टेस्लासारख्या कंपन्यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहे. टेस्ला सायबरट्रक हे येथील कंपनीचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. परंतु हा ट्रक लाँच करण्यास अजून एक वर्ष लागेल. अशा परिस्थितीत फोर्डचे वाहन कोणत्याही स्पर्धेशिवाय अमेरिकन रस्त्यांवर धावताना दिसेल.

काय आहे खास?

हा ट्रक दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या ट्रकचं स्टँडर्ड व्हर्जन सिंगल चार्जमध्ये सुमारे 370 किमीपर्यंत प्रवास करू शकतं. तर त्याचं एक्सटेंडेड व्हर्जन सिंगल चार्जमध्ये सुमारे 483 किमीपर्यंत प्रवास करू शकतं. या गाडीची बॅटरी 10 मिनिटांत इतकी चार्ज होते की, हा इलेक्ट्रिक पिक-अप ट्रक 87 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकतो. यासह, ही बॅटरी केवळ 41 मिनिटांत 15 ते 80 टक्के इतकी चार्ज होते.

फोर्डच्या या पिकअपमध्ये स्टँडर्ड बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे हा पिकअप सिंगल चार्जमध्ये 370 किमी धावतो. ही गाडी 563 bhp पॉवर आणि 1000Nm टॉर्क जनरेट करते. यात 15 इंचाची इन्फोटेन्मेंट स्क्रीन आहे, तर 12 इंचाचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. हा पिकअप ट्रक 4.5 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग धारण करु शकतो. या ट्रकचं वजन 2,267 किलो इतकं आहे.

सबंधित बातम्या

सिंगल चार्जमध्ये 240Km रेंज,’या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्ससमोर अनेक मोठ्या बाईक फेल

टाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारला देशात सर्वाधिक पसंती, विक्रीच्या बाबतीत अव्वल, सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज

Cryptocurrency बाबतच्या एक ट्विटमुळे हिरो बनला झिरो, Elon Musk वर जगभरातून टीकेची झोड

(Ford F 150 Lightning gets 20,000 bookings in single days, can run 483 KM in single charge)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.