Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Made in India Cars : परदेशात पण या भारतीय कारचा डंका, तुम्ही पण होणार फिदा

Made in India Cars : Maruti Suzuki ते Hyundai पर्यंत अनेक भारतीय कंपन्यांच्या मॉडेल्सची परदेशात चलती आहे. त्यांना चांगलीच मागणी आहे. भारतात पण या कारला चांगली मागणी आहे. या कार परदेशात पण एक्सपोर्ट होतात. कोणत्या आहेत या कार आणि त्यांची मॉडेल्स ज्यांची परदेशात पण क्रेझ आहे.

Made in India Cars : परदेशात पण या भारतीय कारचा डंका, तुम्ही पण होणार फिदा
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 4:41 PM

नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : परदेशात पण भारतीय कारचा डंका वाजत आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राने (Automobile Sector) नवीन उंची गाठली आहे. आता भारतात तयार झालेल्या कारला परदेशात पण मागणी वाढली आहे. परदेशात या कारची क्रेझ आहे. आतापर्यंत भारतीयांना परदेशी कारचे अप्रुप होते. ते आजही कायम आहे. पण परदेशातील नागरिकांना भारतीय कारचं वेडं लागलंय, हा बदल सुखावणारा आहे. आता Maruti Suzuki ते Hyundai पर्यंत अनेक भारतीय कंपन्यांच्या मॉडेल्सची परदेशात चर्चा आहे. या कंपन्यांचे काही मॉडेल्स तर परदेशात जोरात विक्री होत आहेत. कोणते आहेत हे मॉडेल्स आणि कोणत्या आहेत या कंपन्या?

Maruti Suzuki Baleno

गेल्या महिन्यात, ऑगस्टमध्ये मारुती सुझुकीच्या या कारने धूम केली आहे. 5 हजार 947 युनिट परदेशात विक्री करण्यात आली आहे. भारतात ही कार 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. Baleno ही कार भारतात 8.35 लाखांपासून (एक्स-शोरुम, दिल्ली) सुरु होते. तर ती 9.88 लाखांपर्यंत (एक्स-शोरुम, दिल्ली) मिळते.

हे सुद्धा वाचा

Hyundai Verna

हुदांई ही कार पण लोकप्रिय आहे. ऑगस्ट महिन्यात या कारने विक्रीत दुसरा क्रमांक पटकावला. 5 हजार 403 कार परदेशात निर्यात करण्यात आल्या आहेत. ही कार 1.5 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह मिळते. Verna च्या किंमतीत शहरानुसार तफावत दिसू शकते. ही कार भारतीय बाजारात 10,96,500 रुपयांपासून (एक्स-शोरुम, दिल्ली) सुरु होते. ती 17,37,900 रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम, दिल्ली) मिळते.

Hyundai Grand i10 Nios

गेल्या महिन्यात हुंदाईच्या या हॅचबॅक कारची मागणी वाढली. 4 हजार 421 कार परदेशात पोहचविण्यात आल्या आहेत. ही कार 1.5 लाख लिटर पेट्रोल इंजिनसह मिळते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये खरेदी करता येते. Grand i10 Nios ची किंमत भारतीय बाजारात 5,37,400 रुपयांपासून (एक्स-शोरुम, दिल्ली) सुरु होते. ती 8,13,300 रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम, दिल्ली) मिळते.

Kia Sonet

किआची कॉम्पक्ट एसयुव्ही सोनेट पण चर्चेत आहे. ही कार परदेशातही चर्चेत आहे. 3 हजार 874 कारची निर्यात करण्यात आली आहे. ही कार 1.0 लिटर पेट्रोल, 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बोचार्ज डिझेल इंजिनसह तुम्हाला मिळेल. या कारची किंमत 7.79 लाखांपासून (एक्स-शोरुम, दिल्ली) सुरु होते. ती 13.09 लाखांपर्यंत (एक्स-शोरुम, दिल्ली) मिळते.

Maruti Suzuki Dzire

टॉप 5 मध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या आणखी एका कारचा क्रमांक लागतो. डिझायर ही कार पण लोकप्रिय आहे. 3 हजार 266 कार परदेशात पाठविण्यात आलेल्या आहेत. ही कार 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह खरेदी करता येते. या कारची किंमत 6,13,500 रुपयांपासून (एक्स-शोरुम, दिल्ली) सुरु होते. ती 9,38,750 रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम, दिल्ली) मिळते.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.