टोयोटा ते मारुती, ग्राहकांसाठी येत आहेत या पाच जबरदस्त CNG कार

| Updated on: Oct 27, 2022 | 8:11 PM

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक जण CNG सेगमेंटकडे वळत आहेत. आवड आणि मागणी लक्षात घेता कंपन्यांनीही आकर्षक कार बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

टोयोटा ते मारुती, ग्राहकांसाठी येत आहेत या पाच जबरदस्त CNG कार
सीएनजी कार
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे भारतात सीएनजी कार (CNG Car) खूप लोकप्रिय झाल्या आहेत, आता केवळ सीएनजी कारच नाही तर इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) देखील भारतीय ग्राहक वळत आहेत. सीएनजी कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीचे वर्चस्व कायम आहे, परंतु आता इतर कार उत्पादकही या सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहेत.  काही आगामी CNG कार मॉडेल्सबद्दल जाणून घेऊया.

  1. Toyota Glanza CNG: टोयोटा लवकरच Glanza चे CNG व्हर्जन लॉन्च करू शकते. लीक झालेल्या ARAI दस्तऐवजानुसार, ही कार 1.2-लीटर के-सीरीज ड्युअल जेट आणि ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह आणली जाऊ शकते. त्याची CNG आवृत्ती 76.4bhp पॉवर जनरेट करेल.
  2. Kia Carens CNG: Kia Sonnet प्रमाणे, Carens CNG देखील काही काळापूर्वी रोड टेस्टिंगमध्ये दिसली होती. या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटर आणली जाऊ शकते.
  3. Kia Sonet CNG: Kia India ने Sonet CNG मॉडेलची चाचणी सुरू केली आहे, ही कार 2022 च्या अखेरीस लॉन्च केली जाऊ शकते. हे वाहन 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह दिले जाऊ शकते. जर ही कार या वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल झाली तर किआची ही पहिली सीएनजी कार असेल.
  4. मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी: मारुती सुझुकी आपल्या ब्रेझा कारचे सीएनजी सेगमेंट लवकरच लॉन्च करू शकते. ही कार 1.5 लीटर बाय-फ्यूल पेट्रोल इंजिनसह लॉन्च केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे की ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दोन्ही पर्यायांसह आणली जाईल. असे झाल्यास ही कंपनीची पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार असेल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. मारुती सुझुकी बलेनो सीएनजी: बलेनोचे सीएनजी मॉडेल आणल्यास, सीएनजीमध्ये विकले जाणारे नेक्साचे हे पहिले मॉडेल असेल. ही कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह आणली जाऊ शकते. ही कार प्रति किलो 25 किमी अंतर कापण्यास सक्षम असल्याचे बोलले जात आहे.