नवी दिल्ली : रेनॉल्ट इंडियाने जुलै 2021 च्या महिन्यात आपल्या संपूर्ण उत्पादनांच्या पोर्टफोलिओवर 65,000 रुपयांपर्यंतचे आकर्षक लाभ सुरु केले आहेत. रेनॉल्टच्या सध्याच्या मॉडेल लाइन अपमध्ये Kwid, Kiger, Triber आणि Duster यांचा समावेश आहे. ऑटोमेकरने आपल्या वेबसाइटवर हे फायदे लिस्टेड केले आहेत, जे नवीन रेनॉल्ट कंपनीच्या खरेदीवर लागू आहेत. (Get up to 65,000 discount on Renault cars, Offer only until July 31st)
या ऑफर रोख सवलत, लॉयल्टी लाभ, एक्सचेंज सवलत आणि कॉर्पोरेट लाभाच्या रूपात उपलब्ध आहेत. सर्व ऑफर 31 जुलै 2021 पर्यंत वैध आहेत आणि राज्य, डीलरशिप, मॉडेलनुसार बदलू शकतात. Renault Kwid 52,000 पर्यंतच्या फायद्यासह विक्रीसाठी आहे. यामध्ये 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 20,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज लाभ आणि 10,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी लाभ यांचा समावेश आहे. कंपनी कॉर्पोरेट्स आणि पीएसयू ग्राहकांना 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॉर्पोरेट सवलतही देत आहे. लक्षात ठेवा, ऑनलाईन बुकिंगवर 2 हजार रुपयांची रोख सूटही दिली जात आहे. तसेच, एसटीडी आणि आरएक्सई 0.8 लिटर व्हेरिएंट 10,000 च्या लॉयल्टी फायद्यासाठी लागू आहेत.
रेनॉल्ट किगर(Renault Kiger) सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही 10,000 रुपयांपर्यंतच्या कॉर्पोरेट सवलतीत उपलब्ध आहे. कंपनी 10,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी लाभ देखील देते ज्यात एक्सचेंज बेनिफिट किंवा रेनॉल्ट मॉडेलसह कार खरेदीवर रोख सूट समाविष्ट आहे. 5,000 रुपयांची ग्रामीण ऑफर देखील आहे जी फक्त शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठी लागू आहे.
Renault Triber साठी, कार निर्माता 2020 मॉडेल आणि 2021 मॉडेलसाठी वेगवेगळे फायदे देत आहे. एमपीव्हीच्या 2020 मॉडेलमध्ये 55,000 रुपयांपर्यंत जास्तीत जास्त लाभ देण्यात आला असून त्यामध्ये 25,000 रुपये रोख सवलत, 20,000 रुपये एक्सचेंज बेनिफिट आणि 10,000 रुपये लॉयल्टी बोनस यांचा समावेश आहे. 2021 मॉडेलचे एकूण फायदे 45,000 पर्यंत आहेत. यात 10,000 रुपयांचा रोख लाभ, ऑनलाईन बुकिंगसाठी 5000 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांचा एक्सचेंज लाभ आणि 10,000 रुपयांच्या लॉयल्टी बोनसचा समावेश आहे. दोन्ही मॉडेल्स कॉर्पोरेट आणि सार्वजनिक क्षेत्रांतर्गत रेनॉल्टसाठी 10,000 रुपये कॉर्पोरेट सवलतसह आहे.
Renault Duster वर 65,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. यात 20,000 रुपयांची रोख सूट, 30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 15,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी लाभांचा समावेश आहे. या ऑफर आरएक्सई 1.5-लिटर पेट्रोल वगळता डस्टरच्या सर्व व्हेरिएंटवर लागू आहेत. कार निर्माता R.e.li.v.e स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत अतिरिक्त 10,000 रुपयांच्या एक्सचेंज लाभाची ऑफर करत आहेत. याशिवाय 15,000 रुपयांची ग्रामीण ऑफर फक्त शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठी लागू आहे. (Get up to 65,000 discount on Renault cars, Offer only until July 31st)
मुस्लीम समाजाच्या 5 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा, काँग्रेस नेते नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीhttps://t.co/ojsgr9flF0#MuslimReservation #Reservation #Congress #NaseemKhan @INCMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 6, 2021
इतर बातम्या
Video | वाशिममध्ये दोन गटात तुफान हाणामारी; राड्याचा व्हिडीओ व्हायरल
JEE Main 2021 : जेईई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा