Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबरदस्त! आता बसमधून भारत-सिंगापूर प्रवास करा! तिकीट बुकींगसह सर्वकाही जाणून घ्या

जर तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर ट्रिप आवडत असतील आणि सुट्टीत मजा करण्यासाठी परदेशात जायचे असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे,

जबरदस्त! आता बसमधून भारत-सिंगापूर प्रवास करा! तिकीट बुकींगसह सर्वकाही जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 9:45 PM

गुरुग्राम : जर तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर ट्रिप आवडत असतील आणि सुट्टीत मजा करण्यासाठी परदेशात जायचे असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे, कारण तुम्ही आता बसने सिंगापूरला जाऊ शकता. गुरुग्राम येथील एका ट्रॅव्हल कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की ते भारत ते सिंगापूर बससेवा सुरू करणार आहेत. ही बस तीन देशांमधून प्रवास करत सिंगापूरला जाईल. (Gurugram based travel company announces India to Singapore bus service, know how you can book ticket)

ही बस सेवा सुरू करण्याची घोषणा अ‍ॅडव्हेंचर ओव्हरलँड नावाच्या कंपनीने केली आहे. कंपनीने लोकांना तिकिट बुक करण्याचे आवाहन केले आहे. सिंगापूरसाठीची ही यात्रा मणिपूरच्या इम्फाळ येथून सुरू होईल आणि म्यानमार, थायलंड आणि मलेशियामार्गे सिंगापूरमध्ये दाखल होईल. ही बस म्यानमारमधील केल आणि यांगून शहर, थायलंडमधील बँकॉक, क्राबी आणि क्वालालंपूर या शहरांमधून जाईल.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा प्रवास इम्फाळ येथून 1 नोव्हेंबरला सुरू होणार असून त्यासाठी तिकीट बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. पहिला येईल त्यास प्राधान्य या नियमानुसार तिकीट विक्री सुरु आहे. भारत ते सिंगापूर आणि सिंगापूर ते भारत प्रवासादरम्यान प्रत्येक टप्प्यात 20 सीट्स उपलब्ध आहेत. हा प्रवास पूर्ण होण्यास 20 दिवस लागतील. यात प्रवाशांना एकूण 4500 किमी प्रवास करावा लागणार आहे.

अ‍ॅडव्हेंचर ओव्हरलँडच्या वेबसाइटनुसार या प्रवासासाठी प्रत्येक व्यक्तीला 6,25,000 रुपये द्यावे लागतील. यात हॉटेल, जेवण, साईटसीन, व्हिसा आणि स्टँडर्ड टूरिस्ट व्हिसा शुल्क अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. याआधी याच कंपनीने दिल्ली ते लंडन बससेवेची योजना जाहीर केली होती आणि जगातील सर्वात प्रदीर्घ रोड ट्रिप म्हणून ही ट्रिप प्रसिद्ध आहे.

हेही वाचा

श्रीनगरला फिरायला जाताय, ‘ही’ ठिकाणं नक्की पाहा

लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा ट्रेकला जाण्याचा विचार करताय? चला तर मग भेट देऊया ‘सिंहगड’ला!

वीकेंडला भटकंतीचा प्लॅन बनवताय? मुंबईजवळची ‘ही’ ठिकाण तुमची वाट पाहतायत!

फक्त 9450 रुपयांत फिरा पूर्ण दक्षिण भारत, IRCTC ने जाहीर केलं खास पॅकेज

(Gurugram based travel company announces India to Singapore bus service, know how you can book ticket)

हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.