Royal Enfield Himalayan ची चायनीज कॉपी बाजारात, Hanway G30 मध्ये काय आहे खास?

चिनी ऑटो मार्केट बर्‍याच बाईक-कारच्या कॉपीसाठी प्रसिध्द आहे. लॅम्बोर्गिनी किंवा डुकाटी प्रत्येक गाडीची कॉपी येथे पाहायला मिळते.

Royal Enfield Himalayan ची चायनीज कॉपी बाजारात, Hanway G30 मध्ये काय आहे खास?
Hanway G30
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 6:56 PM

बीजिंग : चिनी ऑटो मार्केट बर्‍याच बाईक आणि कारच्या कॉपीसाठी प्रसिध्द आहे. लॅम्बोर्गिनी किंवा डुकाटी प्रत्येक गाडीची कॉपी चीनी बाजारात आपल्याला पाहायला मिळेल. पण ही कॉपी करताना त्यात थोडाफार बदल केला जातो. चीनी ऑटो मार्केटमध्ये रॉयल एनफील्डची (Royal Enfield) कॉपीदेखील पाहायला मिळाली आहे. परंतु यातही थोडा बदल करण्यात आला आहे. रॉयल एनफील्ड कंपनीची हिमालयन (Royal Enfield Himalayan) या बाईकची कॉपी चीनच्या बाजारात हॅनवे जी 30 (Hanway G30) म्हणून विकली जात आहे. ही बाईक अधिक आकर्षक करण्यासाठी बाइकमध्ये LED लाइट्स, पूर्ण डिजिटल स्क्रीन आणि अपसाइड फ्रंट फोर्क्स दिले जाऊ शकतात. (Hanway G30 is Chinese copy of Royal Enfield Himalayan, know specs and price)

हॅनवे जी 30 (Hanway G30) ही 250 सीसी अ‍ॅडव्हेंचर टूरिंग मोटरसायकल म्हणून ओळखली जाते. परंतु हिमालयनच्या तुलनेत या गाडीचे काही पार्ट्स, स्पेक्स थोडे हलक्या प्रतीचे आहेत. या बाईकमध्ये तुम्हाला 249 सीसीचे एक सिलिंडर इंजिन मिळते जे 26 बीएचपीची पॉवर आणि 22 एनएमची टॉर्क देते. पॉवरट्रेन ड्युप्लेक्स स्प्लिट डबल क्रॅडल चेसिससह येते. त्याच वेळी, आपण 35 मिमी यूएसडी फ्रंट आणि रीअर मोनोशॉक मिळेल.

Hanway G30 चे फीचर्स

या बाईकच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, Hanway G30 मध्ये टीएफटी इंस्ट्रूमेंट, यूएसडी फोर्क आणि LED लँम्प्ससह DRL दिले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार या बाईकची किंमत 1.92 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक ज्या हिमालयनच्या डिझाईनची कॉपी आहे, त्या बाईकच्या तुलनेत थोडी स्वस्त आहे.

कशी आहे Royal Enfield Himalayan?

रॉयल एनफील्डने अलीकडेच हिमालयनची अपग्रेडेड आवृत्ती बाजारात आणली आहे. कंपनीने ही बाइक 2016 मध्ये प्रथमच बाजारात सादर केली होती. यावेळी ही बाईक महत्त्वाच्या अपग्रेडसह लाँच करण्यात आली आहे. नवीन हिमालयनमध्ये ग्राहकांसाठी ट्रिपर नेव्हिगेशन फीचर देण्यात आले आहे. कंपनीने हे फीचर आधीच Royal Enfield Meteor 350 मध्ये दिले आहे. नवीन हिमालयनची किंमत 2.04 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Honda CB 350 RS vs H’Ness CB 350 : तुमच्यासाठी परफेक्ट बाईक कोणती?

अवघ्या 85 हजारात खरेदी करा 2.13 लाखांची Royal Enfield Thunderbird 500

Royal Enfield 650 cruiser ची रोड टेस्ट सुरु, लवकरच लाँच होणार, जाणून घ्या किंमत फीचर्स

(Hanway G30 is Chinese copy of Royal Enfield Himalayan, know specs and price)

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.