तुम्ही नवीन कार घेतली आहे का? मग डिलिव्हरीपूर्वीच या गोष्टी तपासून घ्या

आपल्या दारात गाडी असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. काही जण पैसे जमवून, तर काही कर्ज काढून गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण करता. गाडी दारात आली की तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. साधा स्क्रॅच जरी गेला तरी जीवाला लागतं. पण दारात गाडी उभी राहण्यापूर्वीच हिरमोड होऊ नये यासाठी काही बाबी तपासणं आवश्यक आहे.

तुम्ही नवीन कार घेतली आहे का? मग डिलिव्हरीपूर्वीच या गोष्टी तपासून घ्या
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 8:25 PM

कार घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं की आनंद गगनात मावेनासा होतो. काय करू आणि काय नको असं होतं. घरातील नव्या पाहुण्याप्रमाणे गाडीचं स्वागत केलं जातं. कारण गाडी घेणं हे सर्वांनाच शक्य होतं असं नाही. त्यामुळे गाडी दारात आली की एक वेगळाच रुबाब असतो. त्यामुळे गाडीला जरा जरी काय झालं तर चिडचिड होते. विचार करा नवीन गाडी दारात उभी राहण्यापूर्वीत असं काही झालं तर… असं होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. गाडी घेतल्यानंतर डिलिव्हरी वेळी काही गोष्टी तपासणं आवश्यक आहे. त्यामुळे तिथल्या तिथेच कार डिलिव्हरी कंपनीला याबाबत सूचना देता येईल आणि पुढील मोठी समस्या टाळता येईल. जर तुम्हीही नवीन कार घेतली असेल तर गाडी दारात आणण्यापूर्वीच पाच गोष्टी तपासून घ्या.

गाडीची बाह्य तपासणी: कारच्या बाह्य भागाचे काळजीपूर्वक तपासणी करा. बॉडी पॅनल्स कोणताही डेन्ट आहे की नाही ते चेक करा. पॅनेलमधील गॅपही तपासून घ्या. गाडीचा रंग व्यवस्थित आहे की नाही तेही बघून घ्या. रंगात कुठे गडबड तर नाही ना.. हलका रंग किंवा जाड थर तर मारला नाही एकदा हात लावून तपासून घ्या. जाड थर असेल तर काही दिवसांनी रंगाचा पापुद्रा निघू शकतो. पातळ रंग लावला असेल तर तो रंग उडू शकतो. चाकांची तपासणी करता ते घासलेले तर नाही हे बघा. क्रॅक वैगैरे आहेत की नाही ते बघा.

गाडीची अंतर्गत तपासणी : गाडी बाहेरून व्यवस्थितरित्या बघून झाली की आतल्या बाजूने तपासणी करा. डॅशबोर्ड आणि उपकरणे व्यवस्थित आहे की नाहीत याची पडताळणी करा. डिस्प्ले व्यवस्थित दिसतोय की नाही. गाडीतील सीट्स व्यवस्थित आहेत की नाही. इतकंच काय तर ऑडिओ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन व्यवस्थित दाखवतंय की नाही ते बघा. आत कसला विचित्र वास किंवा कसले डाग वगैरे नाही ते तपासा.

इंजिन आणि परफॉर्मेन्स : इंजिन ऑइल, कूलंट, ब्रेक, ट्रान्समिशन एकदा तपासून घ्याल. इंजिन ऑईल जुनं नाही ना हे रंगावरून तपासू शकता. बॅटरीला गंज वगैरे चढला नाही ना, बॅटरी सुस्थितीत आहे की नाही याची चाचपणी करा. गाडी सुरु करताना विचित्र आवाज तर येत नाही ना किंवा अधिक वायब्रेशन होत असेल तर लगेच संबंधित डिलिव्हरी कंपनीला सांगा. गाडी चालवाताना गिअर व्यवस्थित पडतो की नाही तसेच गिअर शिफ्टिंगला त्रास होत नाही तेही बघून घ्याल.

ओडोमीटर आणि इंधन : नवीन घेतलेल्या गाडीचे ओडोमीटर रीडिंग 100 ते 150 किमीच्या वर नसावं. जर असं दिसून आल्यास डीलरकडे स्पष्टीकरण मागा. डिलर्स सामन्यत: पाच लिटर मोफत इंधन देतात. त्यामुळे हे इंधन जवळच्या पेट्रोल पंपपर्यतं पोहोचण्यास पुरेसे आहे की नाही याची खात्री करून घ्या.

गाडीची कागदपत्रं : गाडी दारात आणण्यापूर्वी सर्व कागदपत्र नीट तपासून घ्या. कारण यात अटी आणि गाडीच्या पार्टसची वॉरंटी असते. मॅन्युअल एकदा तपासून घ्या. वॉरंटीच्या अटी, कालावधी आणि मायलेज तपासून घ्या. सर्व्हिस कधीपर्यंत मोफत आहे याबाबत जाणून घ्या. तुमच्या नावावर वाहनाची नोंद झाली आहे की नाही तसेच विमा काढला की नाही हे बघून घ्या.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.