भारतासह जगभरात इलेक्ट्रिक मोबिलिटीवर विशेष भर दिला जात आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीबद्दल बोलायचे तर इलेक्ट्रिक स्कूटर, ई-बाईक आणि इलेक्ट्रिक कार सोबत इलेक्ट्रिक सायकल (Electric Cycle) हे देखील एक महत्वाचे साधन सध्या ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरताना दिसत आहेत. सायकल लोकांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशिर मानली जात असते. जर ती इलेक्ट्रिक सायकल असेल तर त्याची मजा काही अधिकच असते. हिरो लेक्ट्रो (Hero Lectro) या लोकप्रिय बाईक निर्माता कंपनीच्या ई-सायकल ब्रँडने गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत, ज्या किंमत, कामगिरी याबाबत या लेखातून अधिक माहिती घेणार आहोत. हिरो लेक्ट्रोची सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक सायकल हीरो लेक्ट्रो एफ2आय (Hero Lectro F2i) गेल्या एक महिन्याच्या वापरानंतर या इलेक्ट्रिक सायकलच्या रिव्ह्यूबाबत या लेखातून चर्चा करणार आहोत.
कुठल्या इलेक्ट्रिक स्कूटर, मोटारसायकल किंवा सायकल खरेदी करीत असताना ग्राहकांचे सर्वात आधी तिच्या लुककडे लक्ष जात असते. लूक अधिक आकर्षक असल्यास ग्राहकांचे मन वळवणे सोपे जात असते. याच पार्श्वभूमीवर हिरो लेक्ट्रो दमदार अन् शक्तिशाली दिसते. तिची बिल्ड क्वालिटी देखील चांगली आहे. यात 27.5 इंच व्हील्स, काळे स्पोक देण्यात आलेले आहेत. हिरो लेक्ट्रो एफ2आयचे हँडल, पेडल्स, बॅटरी स्टोरेज स्टेम, सीट किंवा स्टँड याचीही बिल्ड क्वालिटी उत्तम आहे. सायकल दिसायलाही खूप मजबूत आहे. पेडल्स रिफ्लेक्टरसह अँटी-स्किडने सुसज्ज आहेत. सायकलचा लूक खूपच प्रीमियम आहे.
हिरो लेक्ट्रो एफ2आयची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची राइडिंग. उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उद्देशाने तुम्ही दररोज सायकल चालवत असाल, ऑफिसला जाण्यासाठी 10-15 किमी प्रवासी बाइक म्हणून चालवत असाल किंवा ऑफ-रोडिंग किंवा अउव्हेंचर म्हणून सायकल चालवित असाल तर अशा वेळी युजर्सना खूप आनंद मिळू शकतो. हिरो लेक्ट्रो एफ2आयच्या सीटबद्दल बोलायचे झाल्यास, ती दिसायला थोडी टनक आणि लहान आहे, परंतु जेव्हा तुम्ही त्यावर बसता तेव्हा तुम्हाला आरामदायी वाटते आणि 15-20 किलोमीटर सायकल चालवल्यानंतरही तुम्हाला त्याची जाणिव होत नाही. पेडलवर पायाची ग्रीपदेखील चांगली बसते. हँडलची पोझिशनिंग देखील चांगली आहे जर तुमची उंची कमी असेल तर तुम्हाला यात काही अडचणी निर्माण होउ शकतात.
हीरो लेक्ट्रो वेबसाइटनुसार सध्या सायकलची किंमत 39,999 रुपये आहे. ज्या लोकांना आपले आरोग्य टिकवायचे आहे, या शिवाय प्रवासासाठीही ही इलेक्ट्रिक सायकल विकत घेता येउ शकते. दरम्यान, ही एक माउंटन बाईक असल्याने गर्दीच्या ठिकाणी ती चालवताना अधिक काळजी घ्यावी लागेल.