Hero च्या ‘या’ दोन स्वस्त बाईक्सपैकी तुमच्यासाठी परफेक्ट कोणती? किंमतीत केवळ 1300 रुपयांचा फरक

आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी हिरो मोटोकॉर्पने अलीकडेच आपली सर्वात स्वस्त बाईक हिरो एचएफ 100 (Hero HF 100) लाँच केली आहे.

Hero च्या 'या' दोन स्वस्त बाईक्सपैकी तुमच्यासाठी परफेक्ट कोणती? किंमतीत केवळ 1300 रुपयांचा फरक
Hero Hf Deluxe Vs Hf 100
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 3:59 PM

मुंबई : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) अलीकडेच आपली सर्वात स्वस्त बाईक हिरो एचएफ 100 (Hero HF 100) लाँच केली आहे. ही बाईक दिसायला आकर्षक असून यात खूप चांगले ग्राफिक्स वापरले आहेत. या बाईकची रचना एचएफ डिलक्सप्रमाणेच (HF Deluxe) आहे. यापूर्वी एचएफ डिलक्स ही कंपनीची सर्वात स्वस्त बाइक होती. (Hero HF deluxe Vs Hero HF 100 know which motorcycle is best, know price and features)

या दोन बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये केवळ 1300 रुपयांचा फरक आहे. दोन्ही बाईक्स स्वस्त असल्याने यापैकी कोणती बाईक चांगली आहे, किंवा यापैकी कोणती बाईक खरेदी करायला हवी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी करु नका. कारण आम्ही तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं देणार आहोत. तसेच ही बाईक तुम्ही कशी खरेदी करु शकता, हेदेखील सांगणार आहोत.

दोन्ही बाईक्सच्या किंमतीत केवळ 1300 रुपयांचा फरक

या बाईक्सच्या किंमतींबद्दल बोलायचे झाल्यास हिरो एचएफ 100 (Hero HF 100) बाईक किकस्टार्ट, ड्रम ब्रेक आणि अ‍ॅलोय व्हील्ससह सादर करण्यात आली आहे आणि या बाईकची किंमत फक्त 49,400 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. याशिवाय हिरो एचएफ डिलक्सची (Hero HF Deluxe) किंमत 50,700 रुपयांपासून सुरू होते. या बाईकच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 61,975 रुपये इतकी आहे.

दोन्ही बाईक्समध्ये सारखं इंजिन

Hero HF 100 आणि HF Deluxe दोन्ही मोटारसायकल्समध्ये 97.2cc क्षमतेचं सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 8.36PS पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करु शकतं. सोबतच नवीन Hero HF 100 मध्ये 9.1 लीटरचा फ्यूल टँक देण्यात आला आहे, तर HF Deluxe मध्ये 9.6 लीटर फ्यूल टँक मिळेल.

फीचर्सच्या बाबतीत कोणती बाईक अधिक दमदार?

दोन्ही बाईक्सच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, आपल्याला दोन्ही बाईकच्या बेस मॉडेलमध्ये किकस्टार्ट आणि ड्रम ब्रेक मिळेल. तथापि, नुकत्याच लॉन्च झालेल्या हिरो एचएफ 100 मध्ये तुम्हाला अ‍ॅलोय व्हील्स मिळतील आणि एचएफ डिलक्सच्या बेस मॉडेलमध्ये स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. डिलक्सचं बेस मॉडेल वगळता इतर सर्व मॉडेल्समध्ये अ‍ॅलोय व्हील्स मिळतात. याशिवाय सेल्फ स्टार्टची सुविधा मिळेल.

Hero HF 100 मधील खास बाब म्हणजे या बाईकमध्ये ट्युबलेस टायर्स देण्यात आले आहेत आणि बाईकची किंमत कमी ठेवता यावी यासाठी कंपनीने या बाईकमध्ये काही खर्चात कपातही केली आहे. या बाईकमध्ये ब्लॅक थीमवर मेटल ग्रॅब रेलसह डिझाइन केलेले एक्झॉस्ट आणि क्रॅश गार्ड आहेत. त्याच वेळी, डिलक्स मॉडेलमध्ये हे क्रोम फिनिशसह दिले जाते. कंपनीने Hero HF 100 केवळ एकाच रंगात सादर केली आहे, तर Hero HF Deluxe तुम्हाला 5 वेगवेगळ्या रंगांमध्ये मिळेल. दोन्ही बाईक्सच्या साईजबद्दल बोलायचे झाल्यास, त्यामध्ये काहीच फरक नाही.

इतर बातम्या

अवघ्या 36 हजारात खरेदी करा 1 लाखाची Bajaj Pulsar 150

कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह Bajaj CT110X भारतात लाँच

Hero Destini 125 वर मोठी सूट, स्कूटरमध्ये नवं हिरो कनेक्ट फीचरही मिळणार

(Hero HF deluxe Vs Hero HF 100 know which motorcycle is best, know price and features)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.