Hero MotoCorp : दुचाकी घ्यायची आहे? तर थांबा लागू शकतो मोठा झटका, 1 जुलैपासून वाढणार हिरोच्या दुचाकींची किंमत
पीटीआयच्या वृत्तानुसार, कंपनीने म्हटलेल आहे की, या किमती वाढण्यामागे महागाई आणि वस्तूंच्या वाढत्या किमती आहेत. यापूर्वी टीव्हीएसनेही आपल्या दुचाकींच्या किमतीत वाढ केली होती.

Hero MotoCorp : जर तुम्ही बाइक (Bike) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला धक्का बसू शकतो. चारचाकी असो किंवा दुचाकी सर्वच दुचाकी कंपन्या आपली वाहने महाग करण्यात मग्न आहेत. यंदाही वाहनांच्या किमती वाढणार आहेत. हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने 1 जुलैपासून आपल्या दुचाकींच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, येत्या महिन्यापासून कंपनी आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. वाढत्या महागाई (Inflation) आणि खर्चामुळे कंपनी ही वाढ करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ही वाढिव किंमत वाहनांच्या मॉडेलवर अवलंबून असेल. तर वाहनाच्या कोणत्या मॉडेलवर किती किंमत वाढवायची हे ही ठरवले जाईल.
पीटीआयच्या वृत्तानुसार, कंपनीने म्हटलेल आहे की, या किमती वाढण्यामागे महागाई आणि वस्तूंच्या वाढत्या किमती आहेत. यापूर्वी टीव्हीएसनेही आपल्या दुचाकींच्या किमतीत वाढ केली होती. वाढती महागाई हे किमती वाढवण्याचे कारण असल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे. तर वाहन बनविण्याच्या खर्चात वाढ झाल्यानेच वाहनांच्याही किंमतीवर त्याचा परिणाम होत आहे.
एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये मजबूत पकड
Hero MotoCorp ची देशातील दुचाकी बाजारपेठेत मोठी भागिदरी आहे. एंट्री लेव्हल बाइक सेगमेंटमध्ये कंपनीची चांगली पकड आहे. हिरोची सर्वात परवडणारी एंट्री-लेव्हल बाइक, HF100, 51,450 रुपयांपासून सुरू होते. तर Xpulse 200 4V ची किंमत 1.32 लाख रुपयांपर्यंत जाते. तर या किंमतीत दिल्लीत या गाड्या मिळतात.
बेस्ट सेलिंग बाईक स्प्लेंडर
हिरोची सर्वाधिक विक्री होणारी बाईक स्प्लेंडर आहे. मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 2,62,249 युनिट्सची विक्री केली आहे. यामध्ये स्प्लेंडर प्लसच्या 2,28,495 युनिट्सशिवाय, स्प्लेंडर iSmart आणि Super Splendor च्या एकूण 33,754 युनिट्सची विक्री झाली. Splendor ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत रु. 69,380-79,600 दरम्यान आहे.
वाहनांच्या किमती वाढण्याचे कारण काय?
वाहन निर्मात्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवण्यामागे असा युक्तिवाद केला होता की कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे वाहनांच्या किमती वाढल्या आहेत. मारुती सुझुकीने जानेवारी 2021 ते मार्च 2022 दरम्यान वाहनांच्या किमती सुमारे 8.8 टक्क्यांनी वाढवल्या. परंतु एप्रिलमध्ये, कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या कारच्या किमती सरासरी 1.3 टक्क्यांनी वाढवल्या होत्या.