Hero कंपनीच्या दुचाकी 3 ऑक्टोबरपासून इतक्या टक्क्यांनी महागणार

| Updated on: Oct 01, 2023 | 4:09 PM

ऐन सणासुदीच्या दिवसात भारतातील सर्वात मोठी दुचाकी बनविणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या दुचाकीच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Hero कंपनीच्या दुचाकी 3 ऑक्टोबरपासून इतक्या टक्क्यांनी महागणार
Hero Motocorp
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : तुम्ही दुचाकी घेण्याच्या विचारात असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. ऑक्टोबर महिन्यात हीरो मोटोकॉर्प ( Hero MotoCorp ) कंपनीच्या दुचाकी वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहे. कंपनीने दुचाकी वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ 3 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. कंपनीने आपल्या निवडक दुचाकीच्या ( बाईक आणि स्कूटर ) किंमतीत एक टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप हीरो मोटोकॉर्पच्या मॉडेल आणि वाढलेल्या किंमतीबद्दल विस्तृत माहीती दिलेली नाही.

हीरो मोटोकॉर्प कंपनी दरवाढ ही प्रोडक्ट प्रतिस्पर्धा आणि स्थिती, फॅक्टरींग महागाई दर, मार्जिन आणि बाजार हिस्सेदारीच्या नियमित परीक्षणाचा भाग असल्याचे म्हटले आहे. या वर्षांच्या सुरुवातीला 3 जुलै रोजी आपल्या निवडक मॉडेलच्या किंमतीत 1.5 टक्के वाढ केली होती. सणासुदीचा वाहनांची विक्री जोरात असते. हे पाहून कंपनीने अलिकडे दुचाकीच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

करिझ्मा XMR च्या किंमतीत वाढ

दुचाकी तयार करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी हीरो मोटोकॉर्पने अलिकडेच आपल्या करिझ्मा XMR च्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. कंपनीने करिझ्मा XMR ला एक महिन्यांपूर्वी लॉंच केले होते. 1 ऑक्टोबरपासून या स्पोर्ट्स बाईक 7,000 रु.वाढली आहे. ऑक्टोबर मध्ये लेटेस्ट करिझ्मा 1.80 लाख रु. ( एक्स शोरुम ) मध्ये विकली जाईल.

 बाईक्स आणि स्कूटरची मोठी रेंज

हीरो मोटोकॉर्पने अनेक कारणांमुळे आपल्या दुचाकी वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडे 100 cc पासून 210 cc पर्यंत बाईक्स आणि स्कूटरची रेंज आहे. कंपनी vida को-ब्रॅंड अंतर्गत गेल्यावर्षी पहिली V1 स्कूटर भारतीय बाजारात लॉंच केली आहे.