मुंबई : मोटारसायकल आणि स्कूटर उद्योगात सर्वात मोठी उत्पादक कंपनीनी असलेल्या हिरो मोटोक्रॉपने (Hero MotoCorp) आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीसाठी (fourth quarter) म्हणजेच जानेवारी-मार्च 2022चा विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. या तिमाहीत कंपनीचे कामकाजातून महसूल रु. 7 हजार 422 कोटी होते. तिमाहीसाठी EBITDA मार्जिन 11.2 टक्के होती. तिमाहीसाठी निव्वळ नफा 627 कोटी रुपये होता. एकत्रित महसूल आणि PAT अनुक्रमे 29 हजार 551 कोटी आणि 2 हजार 329 कोटी इतका होता. हिरो मोटोक्रॉपचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निरंजन गुप्ता म्हणाले, ‘अर्थव्यवस्थेत तेजी आल्यानं आम्हाला येत्या काही महिन्यांत मोटारसायकल आणि स्कूटरच्या मागणीत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. अधिक इनपुट खर्चासंबंधी चिंता हे एक आव्हान राहिलं असलं तरी आम्ही परिस्थितीचे निरीक्षण करणं आणि योग्य उपाययोजना करणं सुरू ठेवू. सामान्य मान्सूनचा अंदाज पिकांना मदत करेल. यामुळे ग्रामीण क्षेत्रातील रोख प्रवाह वाढले आणि वाहनांची विक्री अधिक होईल. हे सर्व घटक ग्राहकांच्या भावना आणि बाजारातील मागणीमध्ये मदत करतील.’
हिरो मोटोक्रॉपने आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीसाठी विक्री अहवाल प्रसिद्ध केलाय. कंपनीचा ऑपरेटिंग महसूल 7 हजार 622 कोटी होता. देशातील सर्वात मोठ्या दुचाकी निर्माता कंपनी असलेल्या हिरो मोटोक्रॉपने 2020-21 आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत 885 कोटी रुपयांचा PAT नोंदवला होता. आर्थिक वर्ष 21 च्या चौथ्या तिमाहीत 8 हजार 690 कोटी रुपयांच्या तुलनेत ऑपरेशन्समधील महसूल 7 हजार 497 कोटी रुपयांवर घसरला आहे. हीरो मोटोकॉर्पने नियामक फाइलिंगमध्ये म्हटलं आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीची एकूण विक्री 11.9 लाख युनिट्सवर होती. जी मागील वर्षीच्या 15.68 लाख युनिट्सच्या तुलनेत 24 टक्क्यांनी घसरली आहे.
हिरो मोटोक्रॉपचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निरंजन गुप्ता म्हणाले, ‘अर्थव्यवस्थेत तेजी आल्यानं आम्हाला येत्या काही महिन्यांत मोटारसायकल आणि स्कूटरच्या मागणीत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. अधिक इनपुट खर्चासंबंधी चिंता हे एक आव्हान राहिलं असलं तरी आम्ही परिस्थितीचे निरीक्षण करणं आणि योग्य उपाययोजना करणं सुरू ठेवू. सामान्य मान्सूनचा अंदाज पिकांना मदत करेल. यामुळे ग्रामीण क्षेत्रातील रोख प्रवाह वाढले आणि वाहनांची विक्री अधिक होईल. हे सर्व घटक ग्राहकांच्या भावना आणि बाजारातील मागणीमध्ये मदत करतील.’