हिरो मोटोकॉर्प भारतात हार्ले डेव्हिडसनच्या बाईक विकणार; दोन्ही कंपन्यांमध्ये करार

भारतीय मार्केटमधून गाशा गुंडाळल्यानंतर हार्ले डेव्हिडसनने हिरो मोटोकॉर्पसोबत काम करण्याची घोषणा केली आहे.

हिरो मोटोकॉर्प भारतात हार्ले डेव्हिडसनच्या बाईक विकणार; दोन्ही कंपन्यांमध्ये करार
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 8:38 AM

मुंबई : भारतीय मार्केटमधून गाशा गुंडाळल्यानंतर हार्ले डेव्हिडसनने (Harley-Davidson) हिरो मोटोकॉर्पसोबत (Hero MotoCorp) काम करण्याची घोषणा केली आहे. एका करारानुसार हिरो मोटोकॉर्प आता भारतीय मार्केटमध्ये हार्ले डेव्हिडसनच्या बाईक विकणार आहे. तसेच हिरो त्याची सर्व्हिसदेखील करणार आहे. (Hero MotoCorp will sell Harley Davidson bikes in India)

हार्ले डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्प सध्याच्या डिलर्सच्या माध्यमातून हार्ले डेव्हिडसन बाईकचे पार्ट, अॅक्सेसरीज, जनरल मर्चंडाईज गियर आणि इतर वस्तूंची विक्री करणार आहेत. या कारारानुसार हिरो मोटोकॉर्प हार्ले डेव्हिडसनच्या नावाने प्रिमियम मोटारसायकलची एक रेंज विकसित करणार असून त्याची विक्रीदेखील करणार आहे.

हार्ले डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्पमध्ये झालेला हा करार दोन्ही कंपन्या आणि देशातील हार्ले डेव्हिडसन बाईकच्या चाहत्यांसाठी फायद्याचा व्यवहार ठरणार आहे. हार्ले डेव्हिडसन हा जगातील खूप मोठा ब्रॅण्ड आहे. परंतु भारतात त्यांचं मोठं डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क नाही. मात्र हिरोचं देशात खूप मोठं ड्स्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांना एकमेकांचा फायदाच होणार आहे. तसेच भारतीयांना हार्ले डेव्हिडसन बाईक खरेदी करणं, खरेदी केलेल्या बाईक्सची सर्व्हिसिंग करुन घेणं सोपं जाणार आहे.

हिरो मोटोकॉर्प जगातील सर्वात मोठी मोटारसायकल मेकर कंपनी

संख्येचा विचार केला तर हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वात मोठी मोटारसायकल मेकर कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत 9.5 कोटी मोटारसायकल आणि स्कूटर विकल्या आहेत. तब्बल 40 देशांमध्ये हिरोच्या मोटारसायकल विकल्या जातात.

हार्ले डेव्हिडसनचं पॅकअप?

हार्ले डेव्हिडसन बाईकने अनेक चाहत्यांना भुरळ घातली आहे. जगभरातीली मार्केटमध्ये ज्या बाईकचा बोलबाला पाहायला मिळतो त्या हार्ले डेव्हिडसननं भारतातून गाशा गुंडाळला आहे. गेल्या वर्षी हार्ले कंपनीला तब्बल 22 टक्क्यांपर्यंत तोटा झाला. त्यामुळंच तोट्याचा बाजार सोडून हार्ले आपल्या अमेरिकेतीलच व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

2019 मध्ये हार्लेनं फक्त 2 हजार 676 बाईक्स विकल्या. त्यामध्येही 65 टक्क्यांहुन अधिक बाईक्स या 750 सीसीच्या होत्या. या गाड्यांची असेंबलिंग हरयाणात होत होती. गेल्या 4 वर्षात भारतीय बाजारातून काढता पाय घेणारी हार्ले ही 7 वी कंपनी ठरली आहे. याआधी जनरल मोटर्स, फिएट, सॅनयॉन्ग, स्कैनिया यासह अनेक कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे.

परदेशी कंपन्या भारतात फेल का होतात?

ऑटो एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार, भारतीय बाजारांची अपुरी माहिती हा या कारणातील महत्त्वाचा घटक आहे. मारुती सुझुकीनं भारतीय ग्राहकांची गरज ओळखली, बाजाराचा अभ्यास केला आणि गेल्या कित्येक वर्षांपासून कारच्या क्षेत्रात 50 टक्क्यांहुन अधिक हिस्सेदारी एकट्या मारुती सुझुकीची आहे.

हार्ले कंपनीला बाजारात अगदी स्वस्त आणि अधिक फिचर असणाऱ्या हिरो आणि बजाज या कंपन्यांनी मोठी टक्कर दिली. हार्ले कंपनीच्या बाईक्सची किंमत लाखोंच्या घरात आहे. श्रीमंत वर्ग ही बाईक्स घेईल अशी अपेक्षा असते, मात्र इथंही ग्राहकांनी हार्ले ऐवजी बुलेटला पसंती दिली.

संबंधित बातम्या

Harley Davidson ची भारतातली पहिली ई-बाईक, किंमत तब्बल…

हार्ले डेविड्सनची किंमत वाढवल्यामुळे ट्रम्प भारतावर नाराज

(Hero MotoCorp will sell Harley Davidson bikes in India)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.