Honda ची आफ्रिका ट्विन अॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स
होन्डा ने प्रीमियम स्पोर्ट मोटारसायकल 2021 अफ्रिका ट्विन अॅडव्हेन्चर ही स्पोर्ट बाईक लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचं जाहीर केलं आहे. (honda 2021 africa twin adventure india)
मुंबई : Honda या ऑटोमोबाईल कंपनीने नेहमीच चांगल्या प्रतिच्या दुचाकींची निर्मिती केलेली आहे. या कंपनीच्या दुचाकींना भारतीय बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आलाय. त्यानंतर आता होन्डा ने प्रीमियम स्पोर्ट मोटारसायकल 2021 आफ्रिका ट्विन अॅडव्हेन्चर स्पोर्ट (2021 Africa Twin Adventure Sports) ही स्पोर्ट बाईक लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचं जाहीर केलं आहे. (honda 2021 africa twin adventure sports deliveries is available in india)
Honda 2021 आफ्रिका ट्विन अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स ही बाईक लवकरच भारतीय बाजारात दाखल करणार आहे. ही दुचाकी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. या दुचाकीच्या प्रकारातील मॅन्यूअल ट्रान्समिशन दुचाकीची किंमत 16 लाख रुपये तर ड्युअल क्लच ट्रान्समिशनची सुविधा असणाऱ्या दुचाकीची किंमत 17,50,500 असेल. होन्डा कंपनीकडून सध्या बंगळुरु आणि मुंबईमध्ये या दुचाकी उपलब्ध होतील असं सांगितलं आहे.
या दुचाकीला 1084cc चे पॅरेलल ट्विन इंजिन दिलेले आहे. अफ्रिका ट्विन अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स दुचाकी डीसीटी आणि म्यॅन्यूअल ट्रान्समिशन अशा दोन्ही व्हॅरिएन्टमध्ये नव्या कलरसह उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या स्पोर्ट बाईकला ड्युअल एलईडी हेडलाईट्स, फाईव्ह-स्टेज अॅडजस्टेबल विंडस्क्रीन, अॅडजस्टेबल सीट, हीटेड ग्रिप्स, कॉर्नरिंग लाईट्स, क्रूज़ कंट्रोल आदी सुविधा देण्याता आल्या आहेत.
इंजिनचे काय वैशिष्य?
या नव्या स्पोर्ट बाईकमध्ये 1084 cc चे पॅरेलल ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 73 Kw पावरचे आणि 103 Nm चे टॉर्क जेनरेट करेल. या बाईकमध्ये लिथियम आयनची बॅटरी देण्यात आली आहे. सामान्य दुचाकींच्या तुलनेत या बाईकला दिलेली बॅटरी ही 1.6 पटीने जास्त काळ टिकू शकते. नवी आफ्रिका ट्विन पूर्वीप्रमाणेच दोन ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये येते. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि DCT यूनिटमध्ये ही बाईक उपलब्ध आहे.
बाईकचे फीचर्स काय?
आफ्रिका ट्विनमध्ये 5-स्टेज अॅडजस्टेबल विंडस्क्रीन, अॅडजस्टेबल सीट आणि हीटेड ग्रिप्स देण्यात आले आहेत. तसेच ट्यूबलेस टायरही आहेत. प्रवास चालवणे आरामदायक व्हावा म्हणून अफ़्रिका ट्विन या स्पोर्ट बाईकमध्ये 6.5 इंचची टीएफटी, पूर्म रंगीत मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे.
संबंधित बातम्या :
Tesla ची कार खरेदी करण्यासाठी पैसे नको Bitcoin द्या; एका Bitcoin ची किंमत माहितीय?
प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी लाँच होणार रेनॉ Kiger, डीलर्सकडून बुकिंग सुरु
(honda 2021 africa twin adventure sports deliveries is available in india)