होळीनिमित्त Honda च्या गाड्यांवर 25000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, ऑफर 31 मार्चपर्यंत

होंडा कार्स इंडिया लिमिटेडने (Honda Cars India Limited) या महिन्यात त्यांच्या कारवर काही आकर्षक सवलती आणि ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर होळीच्या निमित्ताने सादर करण्यात आल्या आहेत.

होळीनिमित्त Honda च्या गाड्यांवर 25000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, ऑफर 31 मार्चपर्यंत
Honda Cars Image Credit source: File
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:13 PM

मुंबई : होंडा कार्स इंडिया लिमिटेडने (Honda Cars India Limited) या महिन्यात त्यांच्या कारवर काही आकर्षक सवलती आणि ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर होळीच्या निमित्ताने सादर करण्यात आल्या आहेत. एखादी नवीन Honda कार तुमच्या विश लिस्टमध्ये असेल, तर ती खरेदी करण्यासाठी हीच चांगली वेळ असेल. कारण आम्ही तुमच्यासाठी मार्च 2022 मध्ये होंडा कारवर (Honda Cars) उपलब्ध असलेल्या सर्व सवलतींची (Car Discount Offer) तपशीलवार माहिती घेऊन आलो आहोत. Honda Amaze वर 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. मात्र या कारवर कोणतीही रोख सवलत किंवा एक्सचेंज बोनस उपलब्ध नाही. ब्रँडची कॉम्पॅक्ट क्रॉसओवर WR-V या कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे.

Honda Jazz वर ​​10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंट ऑफरसह 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील आहे. तसेच, खरेदीदार हॅचबॅकवर रोख सवलतीऐवजी 12,158 रुपयांमध्ये मोफत अॅक्सेसरीज मिळवू शकतात.

Honda City आणि Amaze वरील डिस्काऊंट

Honda City (5th-gen मॉडेल) वर, खरेदीदार 10,000 रुपयांची रोख सवलत किंवा 10,596 रुपये किमतीच्या मोफत अॅक्सेसरीज निवडू शकतात. याशिवाय सेडानवर 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध आहे. फोर्थ जनरेशन Honda City साठी 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. सर्व Honda कारवर 5,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे. याशिवाय, ऑफरवर 7,000 रुपयांचा लॉयल्टी एक्सचेंज बोनस मिळत आहे. या ऑफर 31 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध आहेत.

Honda भारतीय बाजारात City Hybrid लाँच करणार

Honda Cars India लवकरच भारतात आपली लाइनअप वाढवण्याचा विचार करत आहे. येत्या काही महिन्यांत हा ब्रँड सिटी हायब्रिड भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे आणि एक नवीन मिड साईज SUV सध्या विकसित होत आहे. या कारची Hyundai Creta, Kia Seltos आणि Skoda Kushak या गाड्यांसोबत बाजारात स्पर्धा असेल.

इतर बातम्या

जुनी वाहनं 8 पट शुल्क भरुन Re register करा, अन्यथा भंगारात काढण्याशिवाय पर्याय नाही

शानदार लूक, ॲडव्हान्स फीचर्ससह Renault Kwid MY22 लाँच, किंमत…

100 फुट लांब कार, हेलिपॅड, गोल्फ कोर्स आणि स्विमिंग पूलसह अनेक सुविधांनी सुसज्ज, गिनीजमध्ये नोंद

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.