Ather Rizta ला तगडी स्पर्धा, Honda करणार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

होंडा कंपनी आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात दाखल करणार आहे. काय आहेत या होंडाच्या पहिल्या इलेक्ट्रीक स्कूटरची वैशिष्ट्ये पाहूयात ...

Ather Rizta ला तगडी स्पर्धा, Honda करणार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 3:24 PM

आपण पाहतोच कि भारतात इलेक्ट्रिक स्कूटरचा ट्रेंड सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे दिवसेंदिवस पेट्रोलच्या किंमतीत वाढ होत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसत आहे. अश्यातच आता अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहे. यामुळे मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना खासकरून स्कूटर आणि बाईक्सची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज सुद्धा आपल्याला ई व्हेइकल्स मार्केटमध्ये आणण्यास तयार आहेत.

आपण जेव्हा अ‍ॅक्टिव्हा स्कुटर घेण्याचं प्लॅन करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर होंडा कंपनीची स्कुटर उभी राहते. कारण होंडा कंपनीच्या अ‍ॅक्टिव्हा स्कुटर चांगल्या प्रकारे रेंज देत असतात म्हणून ग्राहकांनी होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाला मोठा प्रतिसाद दिला आहे. यातच होंडा कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. जपानी ऑटोमोबाईल कंपनीने ‘व्हॉट्स अहेड’ हे शब्दांवरून त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर अखेर लाँच होणार असल्याचे दिसत आहे. येत्या २७ नोव्हेंबरला ही इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली जाणार आहे.

दरम्यान होंडा कंपनीकडून सांगण्यात आले कि, होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटरवर बऱ्याच दिवसांपासून आम्ही काम करत आहोत. कमी खर्चात आणि वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरच्या प्लॅटफॉर्मवर नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याची योजना आहे. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी कमी वेळ लागेल. त्याच्या आगमनामुळे ओला, अथर, हिरो, टीव्हीएस सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपन्यांसाठी स्पर्धा वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

रेंज आणि बॅटरी

जर ही होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर असेल स्कूटरचा परफॉर्मन्स त्याच्या 110cc ICE सारखी असेल. हे Activa ११०चे इलेक्ट्रिक व्हेरियंट म्हणून लाँच केले जाईल अशी अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १००ते १५० किलोमीटरची रेंज देऊ शकते. यात होंडा फिक्स्ड बॅटरी पॅक देण्याची शक्यता आहे. मात्र यात रिमूवेबल बॅटरी पॅक असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

फीचर्स

Honda Activa EV मध्ये प्रीमियम फीचर्स (Premium Features) देण्यात आले आहेत, जे लांब प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. प्रवासादरम्यान जर तुमच्या मोबाइलची बॅटरी कमी झाली, तर यामध्ये असलेला मोबाइल चार्जिंग पोर्ट (Mobile Charging Port) हा एक उपयुक्त फिचर ठरेल. तसेच, Honda Activa EV स्कूटर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी (Bluetooth Connectivity) सपोर्टसह येतो. या स्कूटरमध्ये एलईडी स्क्रीन (LED Screen) देखील आहे, ज्यात स्कूटरची स्पीड, मायलेज, बॅटरी पॉवर यांसारखे सर्व आवश्यक फीचर्स दाखवले जातील.

‘या’ इलेक्ट्रिक स्कुटरशी होईल स्पर्धा

होंडा इंडियाची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर येण्यास बराच वेळ लागला आहे, परंतु टीव्हीएस आयक्यूब, एथर रिझटा, एथर ४५० एक्स, बजाज चेतक आणि ओला एस पहिल्या श्रेणीसारख्या विद्यमान इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत ही स्कूटर कशी कामगिरी करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.