होंडाने लॉन्च केली नवीन स्कुटर, कार सारखे फिचर्स आणि किंमतही बजेटमध्ये

होंडाच्या अधिकृत वेबसाइटवर या स्कूटरच्या किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. कंपनीने Honda Dio स्कूटरमध्ये केवळ नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली नाहीत, तर त्याचे इंजिन..

होंडाने लॉन्च केली नवीन स्कुटर, कार सारखे फिचर्स आणि किंमतही बजेटमध्ये
होंडा डिओImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 6:55 PM

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया ने अलीकडेच त्यांच्या प्रसिद्ध स्कूटर अॅक्टिव्हा चे नवीन एच-स्मार्ट (Activa H-Smart) प्रकार बाजारात आणले. आता कंपनीने आपल्या डिओ एच-स्मार्ट (Dio H-Smart) च्या किंमती देखील जाहीर केल्या आहेत. होंडाच्या अधिकृत वेबसाइटवर या स्कूटरच्या किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. कंपनीने Honda Dio स्कूटरमध्ये केवळ नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली नाहीत, तर त्याचे इंजिन नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियमांनुसार अपडेट केले आहे.

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन डिओ एच-स्मार्ट ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक (ODD-2) अंतर्गत तयार करण्यात आला आहे. एच-स्मार्ट व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 77,712 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, नवीन इंजिनसह DIO STD-OBD2 प्रकाराची किंमत 70,211 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने त्याच्या H-Smart वेरिएंटच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नसली तरी, Activa Smart प्रमाणेच फिचर्स यामध्ये देण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.

अशी आहे वैशिष्ट्ये

Honda Dio H-Smart मध्ये SmartFind सारख्या अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह येईल, ज्यामुळे राइडरला टर्न इंडिकेटर फ्लॅश करून स्कूटर शोधता येईल. तसेच SmartUnlock, जे रायडरला हँडलबार, फ्युएल फिलर कॅप आणि की फॉब वापरून सीटखालील स्टोरेज अनलॉक करण्यास अनुमती देईल. स्कूटरला स्मार्टसेफ देखील मिळते, जे स्मार्ट की काढून टाकताच वाहन लॉक करते. तर स्मार्टस्टार्ट फीचरच्या मदतीने ड्रायव्हर बटन दाबताच स्कूटर सुरू करू शकतो.

हे सुद्धा वाचा

कंपनीच्या एच-स्मार्ट तंत्रज्ञानाने चोरीविरोधी प्रणाली देखील दिली आहे, जी तुमची स्कूटर सुरक्षित ठेवण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही तुमची स्कूटर कुठेतरी पार्क करता, तेव्हा तुम्हाला लॉक पुन्हा पुन्हा तपासण्याची गरज नसते, तुम्ही स्कूटरपासून दोन मीटर दूर जाताच, इमोबिलायझर फंक्शन सक्रिय होते आणि स्मार्ट-की लॉक नियंत्रित करण्यास सुरवात करते.

किंमती उघड झाल्यामुळे आणि आता फक्त औपचारिक लॉन्चची घोषणा करणे बाकी आहे. कंपनीने नवीन OBD2 कंप्लायंट व्हेरियंटसाठी बुकिंगही सुरू केले आहे. अशा परिस्थितीत, पूर्वीप्रमाणेच, या स्कूटरला 109cc सिंगल सिलेंडर नियमित इंजिन दिले जाईल, जे 7.7 BHP पॉवर आणि 9 Nm टॉर्क जनरेट करेल अशी अपेक्षा आहे.

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.