होंडाची शानदार H’Ness CB 350 बाईक भारतात लाँच, किंमत फक्त…

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतात मिड साइज 350-500 सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. त्यासाठी होंडाने त्यांची नवी बाईक H’Ness CB 350 लाँच केली आहे.

होंडाची शानदार H’Ness CB 350 बाईक भारतात लाँच, किंमत फक्त...
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 11:16 PM

मुंबई : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) भारतात मिड साइज 350-500 सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. त्यासाठी होंडाने त्यांची नवी बाईक एच नेस-सीबी 350 (H’Ness CB 350) लाँच केली आहे. या बाईकच्या DLX व्हेरिएंटची एक्सशोरूम किंमत 1.85 लाख रुपये इतकी आहे. (Honda H’Ness CB 350 bike launched in india, booking started)

एचएमएसआय या शानदार मोटारसायकलच्या बुकींगला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना ही बाईक खरेदी करायची आहे, ते पाच हजार रुपये टोकन भरुन बाईकचं प्रिबुकींग करु शकतात. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. भारतीय बाजारात ही रेट्रो स्टाईल बाईक होंडाच्या बिगविंग नेटवर्कद्वारे विकली जाणार आहे.

एच नेस-सीबी 350 या बाईकमध्ये एक 350 सीसीचं पॉवरफुल 4 स्ट्रोक एअरकुल्ड, ओएचसी सिंगल-सिलेंडर आहे. त्यामध्ये पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये पुढे आणि मागे अधिक व्हिजिबिलिटीसाठी एलईडी सेटअप आहे. सोबतच बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि 15 लीटरचा फ्युल टॅन्क आहे.

होंडाच्या सीबी ब्रॅण्डचा (सिरीजचा) एक मोठा इतिहास आहे. 1952 मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली होती. सीबी 92 ही या सिरीजमधली पहिली बाईक होती. एच नेस-सीबी 350 ही बाईक हा इतिहास पुढे नेणार आहे.

होंडा H’Ness CB 350 ची क्लासिक सेगमेंटमधील बाईक्ससोबत स्पर्धा होणार आहे. या सेगमेंटमध्ये बेनेली इंपिरियाले 400, रॉयल एनफील्ड क्लासिक 350, जावा या बाईक्सची तुफान विक्री होते. आगामी काळात येणारी रॉयल एनफील्ड मीटिऑर याच सेगमेंटमधील बाईक आहे.

एका बाजूला नवनव्या बाईक लाँच होत आहेत, तर त्याचवेळी फेस्टीव्ह सीजन जवळ येत असल्यामुळे कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट्सवर मोठमोठ्या ऑफर देत आहेत. अनेक बाईक्सवर मोठमोठ्या ऑफर्स यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. बाईक खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी सध्या चांगली संधी आहे.

अवघ्या एक रुपयात बाईक घरी न्या!

केवळ एक रुपया भरुन हिरो मोटो कॉर्प, होंडा, टीव्हीएससारख्या कंपन्यांच्या बाईक घरी नेता येतील. फेडरल बँकेने देशभरात 947 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे या बाईक खरेदी करण्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

संबंधित बातम्या

BMW ची शानदार बाईक लाँच होण्यास सज्ज, दमदार फिचर्समुळे रायडर्स प्रभावित

PUBG खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बंदीनंतरही खेळता येणार

बॉयकॉट चायनीजचा नुसताच दिखावा, भारतात चिनी मोबाईल्सची तुफान विक्री

(Honda H’Ness CB 350 bike launched in india, booking started)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.